Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeबीडजिल्हाधिकार्‍यांकडून अनुसुचित जाती प्रतिबंधक गुन्ह्यांचा आढावा

जिल्हाधिकार्‍यांकडून अनुसुचित जाती प्रतिबंधक गुन्ह्यांचा आढावा

बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यातील सर्वच जाती धर्मामध्ये शांतता रहावी, गेल्या वर्षभरामध्ये जिल्ह्यामध्ये एकूण अनुसूचित प्रतिबंधक कलमानुसार किती केस दाखल झाल्या? ज्यांच्यावर अन्याय झाला त्याला सामाजिक न्याय विभागाकडून मदत मिळाली का? पोलीस दलाकडून या दोन जातीमध्ये समेट घडविण्यासाठी काही प्रयत्न झाला का? जे पिडित आहेत त्यांच्या केसबाबत कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केला का? या सर्व बाबीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकार्‍यांनी पोलीस अधिक्षक, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त व मुख्य वित्त तथा लेखाधिकारी यांची बैठक घेतली.
या बैठकीमध्ये अनुसुचित जाती प्रतिबंधक कायद्यानुसार ज्यांनी केस दाखल केली. त्यांना तात्काळ शासनाच्या नियमाप्रमाणे मदतीचा पहिला, दुसरा हप्ता देण्यात यावा. ज्याठिकाणी या केसमधील आरोपी अटक केले नाहीत त्यांना अटक करावी. त्यांच्या केसबाबतचा तपास वेगाने करावा आणि याबाबत एकही केसमधील गुन्ह्याचा तपास अपुरा राहू नये. ३१ मार्चपर्यंत या सर्व केसेसचा निपटारा करावा असे आदेश संबंधित विभागाला जिल्हाधिकार्‍यांनी दिले. या बैठकीला समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी, मुख्य तथा लेखाधिकारी जटाळे व अप्पर पोलीस अधिक्षक आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!