इंदोर (रिपोर्टर) ‘भारत जोडो’ यात्रेमुळे सध्या चर्चेत असणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानात पत्र पाठवत राहुल गांधींना धमकी देण्यात आली आहे. यामध्ये राहुल गांधींना बॉम्बने उडवू असं धमकावण्यात आलं आहे. पोलीस आणि क्राइम ब्रांच हे निनावी पत्र पाठवणार्याचा शोध घेत असल्याचं वृत्त ‘एबीपी’ने दिलं आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून धमकीचं पत्र पाठवणार्याचा शोध घेत आहे. राहुल गांधी सध्या महाराष्ट्रात असून 24 नोव्हेंबरला इंदोरमध्ये असणार आहेत. खालसा स्टेडिअममध्ये ते रात्री विश्रांतीसाठी थांबणार आहेत.
भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इंदूरमध्ये बॉम्बनं उडवण्याच्या धमकीचं पत्र आलं आहे. हे इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानात धमकीचं निनावी पत्र आलं आहे. दरम्यान, हे पत्र नेमकं कोणी दिलं? हे अद्याप समजलं नाही. याप्रकरणी पोलिस आणि क्राईम ब्रँचचे अधिकारी तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस जुने इंदूर पोलीस स्टेशन परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करत आहेत. दरम्यान, येत्या 24 नोव्हेंबरलाराहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा इंदूरच्या खालसा स्टेडियममध्ये विश्रांतीसाठी थांबणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांना हे धमकीचं पत्र आलं आहे. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात सुरु आहे. राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात आजच राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दाखल झाली आहे. आज राहुल गांधी यांची शेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे.