कडक सॅल्यूट! बीड जिल्ह्यातील 55 पोलिस हवालदार बनले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तर 295 पोलिस नाईक बनले हवालदार
गणेश जाधव- बीड
बीड : राज्य शासनाने पोलीस नाईक हा संवर्ग रद्द घोषित करून त्या संवर्गातील पदे शिपाई, हवालदार व सहायक फौजदार संवर्गामध्ये वर्ग करण्यास मान्यता दिली होती. त्या निर्णयाच्या अधीन राहून बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी नुकतेच आदेश काढले असून त्यामध्ये
बीड जिल्ह्यातील 55 पोलिस हवालदार यांना बढती मिळाली असून ते सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक झाले आहेत. तर 295 पोलिस नाईक यांची हवालदारपदी बढती करण्यात आली आहे.
बढती झालेल्या सर्व पोलीस हवालदार, सहायक सहायक फौजदार यांचे अभिनंदन केले आहे.
आणखी रिक्त जागा झाल्यानंतर काहींना जुलै पर्यंत बढती मिळणार आहे.