बीड (रिपोर्टर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे खा.सुसांधु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. आज बीड येथे शिवसेनेने राज्यपाल कोश्यारी आणि खा.त्रिवेदी यांच्या फोटोला जोडे मारून जाहिर निषेध केला. संभाजी ब्रिगेडनेही जोडे मारले. शिरूर तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने काळ्या टोपीत सडके कांदे भरून जाळण्यात आले. इतर तालुक्याच्या ठिकाणी देखील कोश्यारी यांच्या विरोधात संताप व्यक्त करत आंदोलन करण्यात आले.
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे खा.सुसांधु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केले. या विधानाचा सर्वत्र जाहिर निषेध करण्यात येत आहे. शिवसेनेच्यावतीने राज्यपाल आणि सुसांधु यांच्या प्रतिमेला बीडमध्ये जोडे मारण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, हनुमान पिंगळे, गणेश वरेकर, सुशील पिंगळे, परमेश्वर सातपुते, दिलीप गोरे, सागर बहिर, नितीन धांडे, रतन गुजर, गोरख शिंगन, सुनिल सुरवसे, सुनिल अनभुले, किशोर जगताप, दिपक काळे, सुनिल गवते, हनुमान प्रसाद पांडे, सर्जेराव शिंदे, हुसेन शेख, गणेश राऊत, राहुल नन्नवरे, सतिष मस्के, सुर्यकांत जगताप, अनिकेत नाटकर, अजय आव्हाड, नामदेव मेहेत्रे, कृष्णा सुर्वे, अमोल गवळी, गौरव वायभटसह आदिंची उपस्थिती होती. संभाजी ब्रिगेडच्यावतीने माने कॉम्प्लेक्स येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या फोटोला जोडे मारून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष राहुल वायकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरूर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने काळ्या टोपीमध्ये सडके कांदे भरून ते जाळण्यात आले. सदरील हे आंदोलन युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली झाले. इतर तालुक्यातही राज्यपाल व सुसांधु यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.