पत्रकार परिषद घेऊन लोकांची दिशाभूल करून तथाकथित हुशारी समोर आणण्याचा केविलवाणा प्रयत्न
गेवराई (रिपोर्टर) शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली नियमबाह्य अतिक्रमणे इथल्या बाजारपेठेच्या विकासाला अडसर ठरत होती. गेल्या अनेक वर्षांपासून या अतिक्रमणधारकांना पर्यायी व्यवस्थेची सुविधा न. प. ने देऊ केली होती. मात्र केवळ आज आरोप करणार्याच्या भूलथापांना व खोट्या आश्वासनाना भुलून त्यांचे नुकसान झाले आसून नगर परिषद ने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली आहे. तर अमरसिंह पंडित आणि शहरातील नागरिकांचा काहीच संबंध नसल्याने त्यांच्या आरोपांना शहरातील सामान्य माणूस देखील गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे मी त्या आरोपांना उत्तर देण्याएवढी ही गंभीर बाब नसल्याचा टोला आ. लक्ष्मण पवार यांनी लगावला आहे.