बीड(रिपोर्टर)ः- काळेगांव हवेली येथील 34 वर्षीय विवाहीत महिलेने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. महिलेचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला असून जो पर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तो पर्यंत शवविच्छेदन करु दिेले जाणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. जिल्हा रुग्ग्णालयामध्ये पिंपळनेर पोलीस दाखल झाले होते.
शोभा रावसाहेब मुंडे वय-34 वषर्र्े, रा.काळेगांव हवेली या महिलेने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. आज सकाळी महिलेचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. शवविच्छेद-नासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. ही आत्महत्या नसून सासरच्या लोकांनी मुलीस मारल्याचा आरोप माहेरच्यांनी केला. महिलेचे माहेर केज तालुक्यातील सरनळी येथील आहे. जो पयर्र्ंत आरोपींना अटक केली जात नाही तो पर्यंत शवविच्छेदन करु दिले जाणार नसल्याचा आक्रमक पवित्रा मयत महिलेच्या माहेरच्या लोकांनी घेतला होता.