Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडअन्नदात्यासाठी आज अन्नत्याग आंदोलन

अन्नदात्यासाठी आज अन्नत्याग आंदोलन


बीड (रिपोर्टर):- विदर्भातल्या चिलगव्हाण येथे 1986 साली पहिली शेतकरी आत्महत्या नोंदवली गेली. त्यानंतर महाराष्ट्रात आत्महत्यांचे सत्र मोठ्या प्रमाणात वाढत गेले. अन्नदात्यासाठी एकदिवस उपवास करावा या दृष्टीकोनातून आजच्या दिवशी राज्यातल्या ठिकठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्यात येते. सदरील हे आंदोलन शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते अमर हबीब यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आले आहे.


   साहेबराव शेषेराव करपे पाटील यांनी 19 मार्च 1986 रोजी पत्नी, दोन मुली व एका मुलासह आत्महत्या केली होती. सततची नापिकी यामुळे बिघडलेली आर्थिक स्थिती या कारणामुळे करपे कुटुंबियाने आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली होती. राज्यातील ही पहिली आत्महत्या म्हणून पुढे आली होती. त्यानंतर महाराष्ट्रात आत्महत्याची संख्या वाढतच गेली. आजही शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहे. ‘एक दिवस शेतकर्‍यासाठी उपवास’ ही संकल्पना शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते अमर हबीब यांना सूचली आणि त्यांंनी अन्नत्याग आंदोलन 2017 पासून सुरू केलं. आज राज्यात विविध ठिकाणी शेतकर्‍यांसाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ.ढवळेंसह आदी अन्नत्याग आंदोलन करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!