बीड (रिपोर्टर) अॅड. अब्दुल रशीद अन्सारी यांचे गुरुवारी (दि.24) निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर मोमीनपुरा भागातील दायरा कब्रस्तान या ठिकाणी शुक्रवारी सकाळी दहा वाजता दफनविधी करण्यात आला. अब्दुल रशीद हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयात वकिली सुरू केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी सहा मूले, एक मुलगी असा परिवार आहे. अन्सारी कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.