कासारी येथे घडली घटना; आरोपीला अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार
न करण्याचा नातेवाईकांचा पवित्रा
धारूर/दिंद्रुड (रिपोर्टर) एका 15 वर्षीय मुलीस विहिरीत ढकलून देत तिच्या सोबत असलेल्या दुसर्या मुलीस पळवून नेल्याची घटना काल दुपारी धारूर तालुक्यातील कासारी येथे घडली. मयत मुलीच्या प्रेताचे अंबाजोगाईच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. जोपर्यंत या प्रकरणातील आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नसल्याचा आक्रमक पवित्रा मुलीच्या नातेवाईकांनी घेतला. दुपारी दीड वाजेपर्यंत या प्रकरणाचा तिडा सुटलेला नव्हता. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.
धारूर तालुक्यातील कासारी येथील साक्षी ज्ञानोबा कदम या मुलीला विहिरीत ढकलून दिले. यात तिचा मृत्यू झाला. तिच्या सोबत असलेल्या दुसर्या मुलीस इंडिका गाडीद्वारे पळवून नेले. या घटनेने धारूर तालुक्यात एकच खळबळ उडाली. मयत मुलीच्या मृतदेहाचे अंबाजोगाई रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह आज दुपारी कासारी येथे आणण्यात आला. नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकरणातील आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा घेतला. दुपारी दीड वाजेपर्यंत तिडा सुटलेला नव्हता. सदरील हा प्रकार नेमका काय आहे, याची सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.