बीड (रिपोर्टर) गेल्या चार दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना ऑनलाईनच्या भानगडीत नाकीनऊ आलेल्या उमेदवारांसाठी कालपासून ऑफलाईन अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. तेव्हापासून आयटीआय कॉलेजमध्ये इच्छुकांची तोबा गर्दी होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने आयटीआय कॉलेजमध्ये पाय ठेवायला जागा नाही, एवढी गर्दी दिसून आली.
ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशींग बांधले आहे तर यंदा थेट जनतेतून गावचा कारभारी निवडला जाणार असल्याने अनेक पॅनल प्रमुखांना सदस्यासाठी उमेदवार मिळत नाही. तु फक्त उभा राहा, आम्ही बघतो, असे म्हणून नवश्यागवश्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली जात आहे त्यामुळे यंदा शेवटच्या दोन दिवसात सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत. बीड जिल्ह्यात होऊ घातलेल्या 704(पान 7 वर)
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी काल सरपंच पदासाठी 1096 अर्ज दाखल झाले होते. तर सदस्य पदासाठी 5313 जणांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज दिले आहेत. एकूण काल 10589 इतके अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले होते. आता अर्ज दाखल करण्यासाठी काही तासाच शिल्लक असल्याने बीडच्या आयटीआय कॉलेजमध्ये इच्छुकांनी तोबा गर्दी केली होती.