वेळेवर हजर नाहीत
जिल्हा रुग्णालयातील 17 कर्मचार्यांना नोटीसा
अर्ध्या
दिवसाचा पगार कपात करण्याचे
निर्देश
बीड (रिपोर्टर) वेळोवेळी निर्देश देऊनही जिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर आणि कर्मचारी वेळेवर हजर राहत नाहीत, आज सकाळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळे यांना रुग्णालयाची पाहणी केली असता सतरा कर्मचारी आपल्या टेबलवर गैरहजर दिसून आले. या सर्वांना नोटीस बजावून त्यांचा अर्ध्या दिवसाचा पगार कपात करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयातला कारभार पारदर्शक करण्याचा प्रयत्न डॉ. सुरेश साबळे हे करत आहेत. सर्व कर्मचार्यांनी वेळेवर हजर राहावे, असे वेळोवेळी त्यांनी बजावलेले आहे तरीही काही कर्मचारी वेळेवर हजर राहत नाहीत, आज सकाळी डॉ. साबळे यांनी रुग्णालयाचा राऊंड घेतला असता यामध्ये ओपीडी, दंत विभाग, आयुष विभाग, 17 नंबर, ऑर्थो, कान-नाक-घसा, सर्जरी विभाग, 16 नंबर, या विभागातील कर्मचारी हजर नसल्याचे दिसून आल्यानंतर डॉ. साबळे यांनी त्यांना नोटीसा बजावल्या आहेत व त्यांचा अर्ध्या दिवसाचा पगार कपात करण्याचे निर्देश देण्यात आले.