बीड (रिपोर्टर) जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. सरपंचपदासाठी 4 हजार अर्ज आलेले आहेत. आज उमेदवारांची छानणी सुरू आहे. सर्व कागदपत्र न दिल्याने काही इच्छुक सदस्यांचे अर्ज बाद झाले. ज्या सदस्यांनी गेल्या वर्षीचा खर्च दाखल केला नही त्यांचे अर्ज देखील बाद होणार असल्याचे सांगण्यात आले. आपला अर्ज उडतो की काय, हे पाहण्यासाठी इच्छुकांनी संबंधित कार्यालयांमध्ये सकाळपासून गर्दी केली होती.
बीड जिल्ह्यामध्ये 704 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान होत आहे. सरपंच पदासाठी 4 हजारापेक्षा जास्त अर्ज दाखल झालेले आहेत. आज अर्जांची छानणी होत आहे. आपला अर्ज राहतो की उडतो हे पाहण्यासाठी इच्छुक सकाळपासूनच निवडणूक कक्ष कार्यालयांमध्ये ठाण मांडून बसलेले होते. कागदपत्रांची पुर्तता न केल्यामुळे काहींचे अर्ज देखील उडाले. गतवर्षी ज्यांनी खर्च दाखल केला नाही अशांचे या निवडणुकीत अर्ज उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बीड तालुक्यासाठी आयटीआय कार्यालयामध्ये छानणी सुरू आहे.