जिल्हाभरातील लाखो मुस्लिम भावीक उपस्थित राहणार
बीड (रिपोर्टर) बीडपासून काही अंतरावर असलेल्या चर्हाटा फाटा परिसरात दोनशे एकरच्या आवारात मुस्लिम धर्मियांचा दोन दिवसीय इज्तेमा होत आहे. हा इज्तेमा उद्या आणि परवा होत आहे. इज्तेमाला जिल्ह्यातून लाखो मुस्लिम भावीक उपस्थित राहणार आहेत. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून जागोजागी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. भावीकांच्या सोयीसाठी पाणी, शौचालय इज्तेमा परिसरामध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
बीडपासून 5 कि.मी. अंतरावर असलेल्या चर्हाटा फाटा परिसरामध्ये दोन दिवसीय इज्तेमा होत आहे. या इज्तेमाची तयारी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. अनेक स्वयंसेवकांनी याठिकाणी मंडप उभारणीपासून इतर कामे केलेली आहेत. इज्तेमाची तयारी पुर्ण झाली. उद्या 8 आणि 9 डिसेंबर रोजी इज्तेमा होत आहे. या इज्तेमाला जिल्हाभरातील लाखो मुस्लिम भावीक उपस्थित राहणार आहेत. इज्तेमास्थळी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची व इतर सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. जवळपास 200 एकर परिसरामध्ये हा इज्तेमा होत आहे. तालुकानिहाय वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. ठिकठिकाणी स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत.