बीड (रिपोर्टर) गेवराई विधानसभा मतदारसंघातील घोसापुरी ग्रामपंचायत बिनविरोध निवडण्यात आली. सरपंचपदी शेख फारुक यांची नियुक्ती करण्यात आली. ही ग्रामपंचायत माजी आ. अमरसिंह पंडित यांच्या ताब्यात आली आहे.
घोसापुरी येथील सर्व नागरिकांनी एकत्रित येत निवडणुक न घेण्याचा निर्धार केला. सरपंचपदी शेख फारुक यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून कल्याण बांड, सुभाष जाधव, सुरेश वैद्य, अजय माळी, विकास वाघमारे, शेख आवेज, लक्ष्मण कदम यांची निवड करण्यात आली. ही ग्रामपंचायत माजी आ अमरसिंह पंडित यांच्या ताब्यात आली. बिनविरोध ग्रामपंचायत निवडल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.