बीड (रिपोर्टर) बीड आरटीओ ऑफिसचे विघ्न काही हटत नाहीत सातत्याने गेल्या दोन-तीन महिन्यापासून आरटीओ ऑफिस चा कारभार चव्हाट्यावर येत आहे दररोज वर्तमानपत्रांमध्ये आरटीओ ऑफिस मधील भ्रष्टाचारी कारभाराचे अधिकारी आणि कर्मचार्यांचे संगणमत सर्वसामान्य लोकांना त्रासदायी ठरत आहेत नवीन गाड्या पासिंग साठी किंवा खरेदी विक्री करणार्या जुन्या गाड्यांच्या विविध परवानग्यासाठी सर्वसामान्य लोकांना खरेदी विक्री करणार्या वाहनधारकांना आरटीओ ऑफिस च्या भ्रष्टाचारी अधिकारी यांनी कर्मचार्यांच्या संगणमताचा त्रास होत आहे कधी वरिष्ठ अधिकारी ऑफिसमध्ये नाहीत दौर्यावर गेले आहेत तर कधी ऑफिसमध्ये लाईट नाही कॉम्प्युटर खराब आहे दोन दिवसांनी चक्कर मारा किंवा चिरी मेरी मागणी केली जात आहे बीड गेल्या दोन-तीन महिन्यापासून आरटीओ ऑफिस च्या चर्चा या वर्तमानपत्रांमधून चव्हाट्यावर येत आहेत मात्र जिल्हाधिकारी या समस्ये कडे कसलंही बघत नाहीत ज्या पद्धतीने घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी उपोषण करते पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्याच पद्धतीने खरेदी विक्री करणारे किंवा गाडी नावावर करणार्या वाहनधारकाला आत्महत्या करण्याची वेळ आल्यावर किंवा आत्महत्या केल्यावर जिल्हाधिकारी लक्ष देतील का जिल्हाधिकार्याने लवकरात लवकर लक्ष घालून भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेल्या बीड आरटीओ ऑफिसचे विघ्नहटवावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अधिकारी आणि कर्मचार्यांच्या बेर जबाबदार कार्याचे पोस्टर लावले जातील असा इशारा राष्ट्रवादी व काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश के के वडमारे यांनी दिला आहे.