Saturday, October 16, 2021
No menu items!
HomeकोरोनाLockdown In maharashtra : रात्री आठ नंतर राज्यात कर्फ्यू , शुक्रवार...

Lockdown In maharashtra : रात्री आठ नंतर राज्यात कर्फ्यू , शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाउन

मुंबई : रिपोर्टर ऑनलाईन

कोरोना साखळी तोडण्‍यासाठी राज्‍यात सर्वत्र ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्‍याचा निर्णय आज राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत घेण्‍यात आला. ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध, उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, .आठवड्यातील शुक्रवारी रात्री ८ पासून, सोमवारी सकाळी ७ पर्यंत लॉकडाऊन असेल, अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी आज दिली.

काळजी घ्या, अन्यथा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्याची वेळ जवळ आली आहे, असे स्पष्ट संकेत दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. याबाबत निर्णय घेण्‍यासाठी राज्यमंत्री मंडळाची आज (दि.०४) दुपारी बैठक झाली. यावेळी लॉकडाउनऐवजी कडक निर्बंध लादण्‍याचा निर्णय यावेळी घेण्‍यात आला. यावेळी रोजगार व अन्‍य प्रश्‍नांवर चर्चा झाली. विरोधी पक्षांनीही सरकारला पूर्ण सहकार्य करण्‍याची ग्‍वाही दिली असल्‍याचे मंत्री नबाव मलिक यांनी सांगितले.

लॉकडाउन टाळायचे असेल तर आपल्‍याला कडक निर्बंध लादणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे रुग्‍णसंख्‍या कमी होण्‍यास कमी होईल. आठवड्याच्‍या शेवटी दोन दिवस मोठे कार्यक्रम असतात, पर्यटनही वाढते. त्‍यामुळे गर्दी वाढते. यामुळेच आठवड्यातील शेवटच्‍या दोन दिवस लॉकडाउन करुन गर्दीवर नियंत्रण आणणे व निर्बंधामुळे कोरोना रुग्‍णांची साखळी आपण तोडू शकतो, असा विश्‍वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

लॉकडाउन कोणालाच नको आहे. पण, वाढती रुग्‍णसंख्‍या पाहता शेवटचा पर्याय हा लॉकडाउन असतो. त्‍यामुळेच कडक निर्बंध आणि आठवड्यातील शेवटचे दोन दिवस लॉकडाउन लागू करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. एप्रिल महिना हा धोक्‍याचा आहे. प्रत्‍येकाने स्‍वत:बरोबर आपल्‍या कुटुंबाची काळजी घ्‍यावी, असे आवाहनही बाळासाहेब थोरात यांनी केले.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!