ग्रामपंचायत मतदारसंघ
विजयी उमेदवार
भांगे चंद्रकांत नरहरी, साखरे धनंजय संपतराव, कचरे रमेश नामदेव, मोरे शितल लक्ष्मण
व्यापारी आडते मतदारसंघ
विजयी उमेदवार
अशोक दरेकर,
शिनगारे संदीप मधुकर
हमाल व तोलारी मतदारसंघ
विजयी उमेदवार
कांदे वाचिष्ठ बप्पाजी
किल्ले धारूर (रिपोर्टर) जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालक मंडळासाठी काल झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीपासूनच भाजपाचे रमेश आडसकर गटाचे उमेदवार आघाडीवर राहिले. 18 संचालकांपैकी तब्बल 17 संचालक रमेश आडसकरांचे दणदणीत मतांनी विजयी झाले. आडसकरांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवारांना पाणी पाजले. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने ही निवडणूक लढविली होती. आडसकरांनी थेट प्रकाश सोळंकेंनाच बाजार समितीच्या निवडणुकीत हाबाडा दिला. राष्ट्रवादीचा केवळ एक उमेदवार विजयी झाला.
बीड जिल्ह्यात 704 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना तिकडे धारूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीने जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते. भाजपाकडून रमेश आडसकर यांनी आपल्या उमेदवारांचं नेतृत्व केलं तर राष्ट्रवादीकडून आ. प्रकाश सोळंके यांनी आपल्या उमेदवारांचं नेतृत्व केलं होतं. आडसकर-सोळंकेंनी या निवडणुकीत प्रचंड ताकद लावली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांकडून प्रचाराची रणधुमाळी जिल्ह्याला दिसून आली असल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. काल 18 जागांसाठी मतदान झाल्यानंतर आज प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीपासून रमेश आडसकर यांच्या गटाचे उमेदवार आघाडी घेऊन राहिले. जेव्हा अंतिम निकाल हाती आला तेव्हा रमेश आडसकरांचे 17 उमेदवार विजयी झाले. सदरच्या निवडणुकीत 18 जागांपैकी एक जागी विठ्ठल गोरे उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते तर उर्वरित 17 जागेसाठी निवडणूक झाली होती यात सेवा सहकारी मतदारसंघ 11, ग्रामपंचायत मतदार संघ 4, व्यापारी व अडते मतदार संघाच्या दोन हमाल व तोलाई मतदार संघ एक अशा एकूण 18 जागा आहेत त्यापैकी 17 जागेसाठी काल निवडणूक झाली होती त्यात भाजपने 17 पैकी 16 जागा जिंकले आहेत केवळ एका जागी व्यापारी आडते मतदारसंघातील अशोक दरेकर विजय झाले आहेत राष्ट्रवादीच्या बाकीचे उमेदवारांना मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे. भाजपाचे उमेदवार बहुमताने विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. रमेश आडसकरांनी आ. प्रकाश सोळंकेंना जबरदस्त हाबाडा दिला.
सेवा सहकारी संस्था मतदार संघ विजयी उमेदवार
बडे सदाशिव महादेव, जाधव बाळासाहेब रामराव, तिडके जयदेव रघुनाथ, तोंडे मंगेश महादेव, धुमाळ दामोदर बाबुराव, मायकर शिवाजी बन्सी, शिनगारे सुनील महादेव, सोळंके भारत नारायण, गव्हाणे सुनीताबाई पंढरी, तिडके कमल अर्जुन.