Monday, April 19, 2021
No menu items!
Home क्राईम अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू बीड-नगर महामार्गावर कासारी जवळील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू बीड-नगर महामार्गावर कासारी जवळील घटना


आष्टी (रिपोर्टर) :-बीड – अहमदनगर महामार्गावर आष्टी तालुक्यातील कासारी गावानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत 32 वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी पहाटे 5 च्या सुमारास घडली क्रांती इंद्रजित नागरगोजे असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter

IMG 20210405 WA0152


उस्मानाबाद जिल्ह्या भूम तालुक्यातील जयवंतनगर येथील रहिवासी क्रांती इंद्रजित नागरगोजे हे आपल्या दुचाकी क्रं. एम.एच. 12 टीएफ 263 या गाडीवरून रांजणगाव येथून गावाकडे परतत असताना सोमवार दि.5 एप्रिल रोजी पहाटे 5 च्या सुमारास बीड – अहमदनगर महामार्गावर आष्टी तालुक्यातील कासारी गावानजीक अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळाचा पो.ना.ए.एम सुंबरे, पो.ना. के.आर. शिरसाठ यांनी पंचनामा केला असून आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले,आष्टी पोलिस अज्ञात वाहनाचा शोध घेत असून पुढील तपास पो.ना.ए.एम सुंबरे हे करत आहेत.

Most Popular

उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...

अग्रलेख -निर्लज्जम्

एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...

जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...

धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या

बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...