पाटोदा ( रिपोर्टर ) पाटोदा तालुक्यातील 34 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सहा ग्रामपंचायत बिनविरोध निवड झाल्या तर 28 ग्रामपंचायतीचे मतदान दिनांक 18/12/2022 रोजी होऊन आज दिनांक 20/12/2022 रोजी निकाल जाहीर झाला आहे.
पाटोदा तालुक्यातील बिनविरोध निवड झालेल्या ग्रामपंचायत मध्ये पारनेर, कुसळंब,लांबरवाडी,सावरगाव घाट,निवडुंगा व पांढरवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून पिंपळवंडी सौ.शितल निलेश मोरे,अंतापुर लीलाबाई भाऊसाहेब गाडे, डोंगरकिन्ही आण्णासाहेब येवले,सौताडा चंपाबाई तुकाराम घुले, नफरवाडी बंडु सवासे,पाचंग्री गणेश भालचंद्र मुंढे, भायाळा सौ. सत्यभामाताई रामकृष्ण बांगर,चिंचोली रोहीणी मारोती सांगळे, जौळाला ज्ञानेश्वर जगदाळे, बेणसुर विद्या गायकवाड,कोतन वैशाली महेश खेंगरे, येवलवाडी ना सौ.विजया किशोर नागरगोजे,पाचेगाव विमल थोरात, नायगांव मंजुशा संदीप कवठेकर, महासांगवी सौ.चैताली नामदेव सानप,गवळवाडी सौ.सुषमा बाबुराव सोंडगे,अंमळनेर लीलावती श्रीपती गाडे, डोमरी मंदा विठ्ठल जगताप,तळे पिंपळगाव बाळासाहेब चौरे,सावरगाव सोने नारायण नागरगोजे, थेरला सौ.नम्रता चंद्रकांत राख,येवलवाडी स गंगुबाई रावसाहेब येवले, पिठ्ठी मंगल प्रभाकर कवठेकर,चिखली नाथ तात्यासाहेब नवनाथ लाड ,करंजवण आशाबाई बाबासाहेब उगलमुगले, कारेगाव रऊफभाई सय्यद,सोनेगाव/सौंदाणा सौ.रुपाली गणेश भालेकर व नाळवंडी डॉ.एकबाल पठाण या तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीच्या दिनांक 18/12/2022 रोजी मतदान होऊन दिनांक 20/12/2022 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला.निवडणुक निर्णय अधिकारी तहसीलदार रुपाली चौगुले व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार सुनील ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्यवस्थीत पार पडली.या निवडणूकीसाठी पाटोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार व पोलीस उपनिरीक्षक पंतगे यांनी चोख असा बंदोबस्त ठेवला होता.