Sunday, April 18, 2021
No menu items!
Home क्राईम ढेकणमोहात तहसीलदारांच्या गाडीवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

ढेकणमोहात तहसीलदारांच्या गाडीवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न


गाडीचे नुकसान, दोन ट्रॅक्टर ताब्यात, दोन फरार
बीड (रिपोर्टर):- अवैधरित्या वाळुची तस्करी करणार्‍या चार ट्रॅक्टरचा पाठलाग करत असताना एका ट्रॅक्टर चालकाने स्वत:च्या ताब्यातील ट्रॅक्टर थेट तहसीलदारांच्या गाडीवर घालण्याचा प्रयत्न केल्याने ट्रॅक्टरची तहसीदारांच्या गाडीला धडक झाल्याने गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाले मात्र तहसीलदार बालबाल बचावले. सदरची घटना आज सकाळी साडेअकरा वाजता ढेकणमोहा जवळ घडली. यातील दोन ट्रॅक्टर पोलीसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पिंपळनेर पोलीसात सुरू होती.

a13


   बीडचे तहसीलदार वमने दोन मंडळ अधिकार्‍यांसोबत ढेकणमोहाकडे जात असताना त्यांना वाळुची तस्करी करणारे चार ट्रॅक्टर दिसले. वमने यांनी संबंधित ट्रॅक्टरचा पाठलाग सुरू केला असता ट्रॅक्टर चालकांनी आपले ट्रॅक्टर ढेकणमोहा गावामध्ये घातले. त्यावेळी तहसीलदारांची गाडीही त्या दिशेने गेली. त्याचवेळी एका ट्रॅक्टर चालकाने स्वत:च्या ताब्यातील ट्रॅक्टर थेट तहसीलदारांच्या गाडीच्या दिशेने भरधाव वेगात आणले. त्यामुळे तहसीलदारांच्या गाडीला धडक लागल्याने तिचे काही प्रमाणात नुकसान झाले. तहसीलदार वमने हे शासकीय गाडी क्र. एम.एच. 23 एफ 1002 यामध्ये बसलेले होते. त्यांच्या सोबत मंडल अधिकारी तांदळे, नागरगोजे हेही होते.

a11

                                                                              तहसीलदारांनी पाठलाग केलेल्यांमध्ये दोन ट्रॅक्टर फरार झाले तर दोन ट्रॅक्टर ताब्यात असल्याचे सांगण्यात येते. याबाबत रिपोर्टरने थेट तहसीलदारांशी संपर्क साधला असता त्यांनी सदरची घटना ही खरी असल्याचे सांगून या प्रकरणी पिंपळनेर पोलीसात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे म्हटले.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...