किल्ले धारूर (रिपोर्टर) आज सकाळी तहसील कार्यालयातील तळ मजल्यावर मतमोजणीस सुरूवात झाली. मतमोजणीच्या सुरुवातीस तहसीलदार अनिता भालेराव यांनी कर्मचार्यांना निवडणुक गोपनीयतेची शपथ दिली. सुरवातीला पहिल्या फेरी मध्ये खोडस, कोळपिंपरी, व पांगरी ग्रामपंचायतीची मतमोजणी करण्यात आली. अशाप्रकारे एकूण नऊ फेर्यांमध्ये दुपारी दीड वाजेपर्यंत सर्व 15 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला मतमोजणीसाठी पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता तहसील कार्यालय तसेच परिसराला छावणीचे स्वरूप आले होते . भाजप राष्ट्रवादीमध्ये चुरस वाढली होती त्याचबरोबर काही ठिकाणी स्थानिक पॅनल देखील झालेले होते दुपारी दीड वाजेपर्यंतचा निकाल
तांदळवाडी येथील एका वार्डामध्ये दोन्ही उमेदवारांना समान मते 160 मते पडली होती सोहम शिंदे या लहान मुलाच्या हाताने चिठ्ठी काढण्यात आली त्यात शुभांगी हांडे या विजयी झाल्या.
धारूर तालुक्यात इंदिरा काँग्रेस या पक्षाने खाते खोलले आहे एकमेव बोडखा ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे उमेदवार अशोक तिडके विजयी झाले आहेत.
गावाचे नाव विजय सरपंच
खोडस – रामधन मोहन लाखे (598), कोळपिंपरी – अशोक अर्जुन यादव( 568 ) ,पांगरी – सुनीता डोरले ( 327) , आवरगाव – अमोल जगताप (743) ,चिंचपूर – विजयमाला समुद्रे ( 573) , वाघोली -सोजरबाई गायकवाड( 356) , गांजपूर -. कस्तुरा साला पवार (457), तांदळवाडी – पंडित उमाकांत साखरे (379) , अंजनडोह -उषा सूर्यकांत सोळंके ( 865) , असरडोह – देशमुख मंगल आबासाहेब , आसोला -महादेव चोले , उमरेवाडी – गौतम दहिफळे, अंबेवडगाव – उत्तरेश्वर घोळवे , गावांदरा- सौंदरमल अविद्या मधुकर , चोंडी -राजश्री नामदेव मुंडे, बोडखा – अशोक तिडके, कारी – भाग्यश्री दिपक मोरे, चोरांबा – सुभाष साक्रुडकर