Sunday, April 18, 2021
No menu items!
Home संपादकीय महाविस्फोट, कोरोना आणि दारिद्य्राचा?

महाविस्फोट, कोरोना आणि दारिद्य्राचा?


जगात सतत बदल होत आलेला आहे. पुर्वी अनेक आजाराच्या विळख्यात माणुस सापडत होता. प्लेग, पटकी, स्पॅनिश प्लू या सारख्या आजाराने जगातील लाखो लोक त्या-त्या वेळी मरण पावले. त्यावेळी या आजारावर औषधं नव्हते. लोकांना मरण दिसत होतं. तरी लोक अगदी हातबल झालेले होते. नियतीपुढे लोकांचा काही निभाव लागला नाही. जसा-जसा बदल होत गेला, तसे आजार बदलू लागले. सन 1500 नंतर जगात तंत्रज्ञानाचा विकास होऊ लागला. त्याची सुरुवात युरोप खंडात झाली. त्यामुळे माणसाचं जीवन थोडं सुखद व्हायला सुरुवात झाली. सन 1900  नंतर बदलाने वेग घेण्यास सुरुवात केली. शहरीकरण झपाट्याने वाढले. खेड्यांचा विकास होत गेला. संपर्काचंं साधन निर्माण झालं. आज जग इतकं फास्ट झालं की, माणसाने अनेक ग्रहावर यान सोडले, कित्येक विघातक अस्त्र त्याने निर्माण केले. काही मिनिटात पृथ्वी नष्ट होवू शकते इतके अणुबॉम्ब जगात आहेत. माणसाच्या किर्तीचा चोहीकडे डंका वाजलेला आहे. सत्ता,पैसा, अधिकाराच्या परिघात माणुस वावरू लागला. श्रीमंत-गरीब अशी दरी निर्माण झाली, तसा हिंसाचार ही वाढला. जगात अनेक देश महासत्ता होण्यासाठी रात्र-दिवस स्पर्धा करत आहेत. अमेरिका सध्या सगळ्यात मोठी आर्थिक महासत्ता असली तरी ह्याच अमेरिकेचे आज कंबरडे मोडले आहे. यापुर्वी अमेरिकेला कधीच इतकी झळ बसली नव्हती ती कोरोनाने बसली. इतर प्रगतीशील देशातही आर्थिक परस्थिती वाईट झालेली आहे. जो-तो देश आपली आर्थिक परस्थिती सुधारण्यासाठी धडपड करु लागला, पण कोरोना यात अडथळा म्हणुन पुढे येतांना दिसून येत आहे.
भाजपाला विसर पडला
कोरोना नावाचा विषाणू माणसांचा पिच्छा सोडायला तयार नाही. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात कोरोनाने देशात हातपाय पसरायला सुरुवात केली. जसाच कोरोनाचा शिरकाव झाला, तसं पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन केलं होतं. महाभारताचं 18 दिवस युध्द सुरु होतं, आपल्याला 14 दिवस कोरोनाशी युध्द करायचं आहे, असं म्हणुन मोदी यांनी 21 दिवस लॉकडाऊन करुन टाकलं होतं. लॉकडाऊनच्या कार्यकाळात मोदी यांनी लोकांना थाळ्या, टाळ्या वाजण्याचं ही सांगितलं होतं, जेणे करुन कोरोना पळून जाईल अशी त्यांना आशा होती, पण सगळं काही करुन देखील कोरोना काही गेला नाही. तो पुन्हा जास्तच ‘वरचढ’ झाला आणि त्याने दुसर्‍यांदा फास्ट शिरकाव केला. सध्या देशभरात कोरोनाने थैमान घातलेलं आहे. देशात रोज हजारोने नवीन रुग्ण सापडतात. कित्येकांचा बळी जात आहे. कोरोनाचा नायनाट लॉकडाऊनमुळे होईलच असं सागितलं जात होतं. लॉकडाऊनचा तितका परिणाम वर्षभरात झालेला दिसला नाही. लॉकडाऊन तरी किती दिवस करायचं हा ही प्रश्‍नच आहे? लॉकडाऊनला राज्यात भाजपाचा विरोध आहे, पण भाजपा विसरत आहे की, मोदींनी जे रातोरात लॉकडाऊन केलं होतं, त्याचा लोकांना किती त्रास झाला या बाबत फडणवीस, चंद्रकांत पाटील बोलत नाहीत, म्हणजे आपण केलं तर ते चांगलं आणि इतरांनी केलं ते वाईट असचं भाजपाला वाटत असतं.  
निवडणुकीत कोरोना मेला
कोरोनाच्या बाबतीत सतर्क राहण्याचे आवाहन केंद्र सरकार करत आहे. मात्र निवडणुका घोषीत होताच, केंद्रातील सर्वच मंत्री आणि बडे नेते निवडणुक सुरु असलेल्या राज्यात तळ ठोकून असतात. सध्या पाच राज्यातील निवडणुका होत आहेत, या निवडणुकीत सार्‍याच पक्षाच्या पुढार्‍यांनी जीव तोडून प्रचार सुरु केला. सगळ्यात जास्त आश्‍चर्याची बाब म्हणजे पंतप्रधान मोदी यांची आहे. पंतप्रधान हा देशाचा असतो,याचाच विसर मोदी यांना पडू लागला. मोदी  कुठल्याही निवडणुकीत चोवीस तास मग्न  असतात. मोदी यांना सध्या देशाचा विसर पडला की काय अशीच अवस्था झाली? एकीकडे देशात कोरोनाचे थैमान सुरु आहे, दुसरीकडे पंतप्रधान खोट्या बाता मारुन वेळ निभावून नेत आहेत. कधी ते बंगालच्या संग्रामात सहभागी असल्याचे सांगत आहेत, तर कधी ते विकासाचे फेक आकडे सांगत असतात. पंतप्रधानांना इतकं काही प्रचारात मग्न होण्याची गरज नाही. निवडणुकीपेक्षा देशातील प्रश्‍नाकडे त्यांनी लक्ष दिले असते, तर आज काही प्रमाणात का होईना परस्थिती बदलली असती? त्यांना देशाचं देणं-घेणं नाही का असचं  दिसू लागलं?  देशाचं उत्पन्न घटलं, आार्थिक स्थर खुपच खाली गेला. महागाई वाढली. गोड तेल खावे की नाही असचं झालं. या मुद्दयावर भाजपावाले काहीच बोलत नाहीत. आहे तसचं चालू द्या, लोकांचे प्रश्‍न बाजुला सारुन रोज काही ना काही बहाणे किंवा इतर मुद्दे समोर आणले जातात. जेणे करुन खरे मुद्दे मागे पाडले जात आहेत. पाच राज्यातील निवडणुकीच्या प्रचारात इतकी मोठी गर्दी केली जाते. या गर्दीत कोरोना वाढत नाही का? ज्या राज्यात निवडणुका आहेत. तेथील कोरोनाची आकडेवारी समोर येत नाही. आकडेवारी घोषीत करु नका असं तर बजावण्यात आलं नाही ना? लोकांच्या गर्दीत पाच राज्यातील कोरोना मेला की काय?
निवडणुका सर्व काही नाही
निवडणुका जिंकण्यासाठी काही ही कराचयं नसतं. माणुस महत्वाचा आहे याचा विसर राज्यकर्त्यांना पडला? पाच राज्यात जो काही पैशाची प्रचंड प्रमाणात उधळपट्टी सुरु आहे, ती नक्कीच शोभणारी नाही. एखाद्याला पराभूत करण्यासाठी भाजपावाले नको ते कृत्य करु लागले, हे या पाच राज्यात दिसून येत आहे. गेेल्या एक वर्षापासून पश्‍चिम बंगाल राजकारणातून भाजून निघत आहे. एकीकडे महाराष्ट्र, दिल्लीसह काही राज्यात कोरोनाने थैमान घातले. त्यामुळे ही राज्य पुर्णंता अपंग झाल्यासारखी झाली. या राज्यांना कधी केंद्राने सढळ हाताने मदत केली नाही. जे राज्य भाजपाच्या ताब्यात नाहीत, त्या राज्याला केंद्राची सहकार्याची भुमिका राहिली नाही. बिगर भाजपाच्या राज्यांना केंद्राच्या मदतीने उध्दवस्त करण्याचं काम केलं जात आहे. महाराष्ट्रात काही घटना घडली की, भाजपाचे लोक तात्काळ राज्यपालांची भेट घेवून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करतात. उठ-सुट राज्यपालाकडे जाण्याची उबळ भाजपावाल्यांना येवू लागली. तसा विचार केला तर देशातील भाजपाच्या ताब्यात असलेल्या किती राज्यात चांगली सुव्यवस्था आहे? महाराष्ट्र चांगलचं राज्य आहे, पण भाजपावाले राज्याला बदनाम करण्याची एक ही संधी सोडत नाही. बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या सारख्या मागास राज्यात नेहमीच माणुसकीला काळीमा फासणार्‍या घडना घडतात, तरी भाजपावाले शांत असतात. न्यायाचा तराजू सगळ्याकडे सारखाच असला पाहिजे. त्यात दुजाभाव का करावा? निवडणुकीच्या वेळी जे काही राजकारण खेळाचयं ते खेळावे, संकटात राजकारण असतं का?
दारिद्रयाचा विळखा
देशात गरीबांची संख्या जास्त आहे. स्वातंत्र्यानंतर गरीबी हटावचा नेहमीच नारा दिला गेला, पण गरीबी काही हाटली नाही. 2014 साली मोदी यांनी जे काही स्वप्न दाखवले होते, ते आज झटपट पुर्ण होतात की काय आणि आपल्या खात्यावर पंधरा लाख रुपये पडतात की काय असं लोकांना वाटलं? मात्र मोदी गेल्या सात वर्षापासून देशाचा कारभार हाकत आहे. पंधरा लाखच काय साधे पंधरा रुपये लोकांच्या खात्यात पडले नाही. ज्या तरुणांनी मोठया उत्साहात मोदी यांना पाहून भाजपाला मतदान केलं होतं, त्यातील जवळपास सगळेच तरुण आज बेकार आहेत. त्यांना रोजगार मिळालाच नाही. उलट ज्यांचा रोजगार होता त्यांचा रोजगार गेला, देशात मध्यमवर्गीयांची संख्या 35 कोटी पर्यंत आहे. मध्यमवर्ग तसा जेमतेम असतो. मात्र कोरोनाने मध्यवर्ग देखील परेशान झाला. त्याला काय करावे हे समजेना? लोकांच्या हातात पैसा येईना. कोरोनाची लस आली असली तरी ती एक ते दोन टक्के लोकापर्यंत गेली. लसीकरणाचा वेग वाढवण्यास सरकारला अपयश आले. लसीकरण वाढणे हे अत्यंत गरजेचे आहे. कोरोनामुळे कधी नव्हे इतके मोठे नुकसान जगाचे झाले. कोणताच देश असा नाही, ज्याला आर्थिक झळ बसली नाही. कोरोनामुळे जग दहा वर्ष मागे गेले असा दावा अर्थतज्ञ करत आहेत. कोरोनातून सावरणं ही मोठी मुश्कील बाब झाली. देशातील जो गोर-गरीब पोटासाठी संघर्ष करत आहे. त्याच्या पोटावर कोरोनाने पाय दिला. देशाची खरी आर्थिक नाडी ही सर्वसामान्य जनता आहे. तीच आज आर्थिक दारिद्रयात सापडल्याने चिंता व्यक्त केली जावू लागली. देशात आणि जगात नेहमीच अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असतो, मग त्याला काही प्रमाणात राजकारणी जबाबदार असतात. स्वत:च्या स्वार्थासाठी लोकांना झुंजवण्याचं काम केलं जात आहे. कोरोनाने लोकांच्या हातातील काम हिरावून घेतले. त्यामुळे त्यांच्या डोक्यात नेहमी कामाचाच विचार असतो. हाताला काम आणि पोटाला भाकर मिळणे ही प्रमुख गरज आहे. हे नाही मिळाले तर अराजकता निर्माण होवू शकते. जागतीक किर्तीचे अर्थतज्ञ जोसेफ स्टिग्लीज यांनी असं म्हटलं की, कोरोनाच्या परिणामामुळे जगात मोठं आर्थिक संकट कोसळणार आहे. यामुळे दारिद्रयाचा आणि गुन्हेगारीचा महास्फोट झाला तर नवल वाटू नये? कोरोना आणि आर्थिक मंदीचा लोकांना विळखा पडला हा विळखा कधी सुटेल हे येणारा काळच सांगेल? सध्या तरी जगातील माणुस संकटात आहे. या संकटातून तो स्वत;ला सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....