वडवणी तालुक्यातील 25 ग्रा.प.निवडणुकीचे निकाल जाहिर
वडवणी (रिपोर्टर):- वडवणी तालुक्यातील 25 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून यात बाहेगव्हाण, पिंपळटक्का, हिवरगव्हण आणि ढोरवाडी गांवाचे सरपंच पदाचे उमेदवार हे अल्पशा मताने घासून आले आहेत.तर निवडून आलेल्या सरपंच पदाच्या उमेदवार गटाकडून एकच जल्लोष करण्यात आला आहे.
याबाबत आधिक माहिती अशी कि, वडवणी तालुक्यातील 25 ग्रा.प.निवडणुकीचे निकाल आज तहसिल कार्यालय याठिकाणी लागले आहेत.यामध्ये बाहेगव्हाण येथील महाविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार सौ. स्मिथा डिंगाबर किरवले यांना 4 मताने तर पिंपळटक्का सरपंच पदाचे उमेदवार संतोष वाचिष्ठ कदम यांना 3 मतानी तसेच हिवरगव्हण येथील पुष्पा संपत काजळे ह्या फक्त 1 मतानी विजयी झाल्या आहेत.तर ढोरवाडी येथील सरपंच पदाचे उमेदवार आत्माराम सिताराम माने यांना 6 मतानी विजयी झाले असून तिगांव- अर्चना राज पाटील यांची 300 मतापेक्षा आधिक मतानी विजय मिळविला आहे.चिंचाळा मध्ये विद्यमान सभापती बळीराम आजबे यांच्या पँनला मतदारांनी नाकारले असून येथे भाजपाचे विद्यमान सरपंच शिवाजी मुंडे यांच्या पँनलचे सौ.सिता सुभाष आजबे या निवडून आल्या (पान 7 वर)
आहेत.उपळीमध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास ढगे यांनी बाजी मारत मातब्बदारांना धूळ चारत सचिन भागुराव हळकर यांचा मोठ्या फरकाने विजय प्राप्त झाला आहे.पुसऱ्यामध्ये कांताबाई डिंगाबर सावंत, कुप्पा – सौ.कमल प्रल्हाद सोनवणे,खिळवट लिंमगांव
– गणेश दमोदर आंबुरे,कोठारबन – अशोक दिलीप मुंडे, चिखलबीड – सौ.सागर विलास वडणे, मोरेवाडी – लहू यशवंत काळे, केंडेप्रिंप्री – वर्षा संजय धपाटे, पिंपळा रुई – रुक्मिणी केशव आंधळे, दुकडेगांव – सौ.कौशल्य नारायण बडे, देवगांव – रामेश्वर आश्रुबा सुरवसे, रुई पिंपळा- सौ.छाया शंकरराव आंधळे, साळींब्यात परिवर्तन झाले असून याठिकाणी सौ.अश्विनी दिनेशराव नाईकवाडे, पिंपरखेड – सौ.लता ज्ञानोबा शिंदे,काडीवडगांव – सौ,प्रभावती लक्ष्मण हातागळे, चिंचवण – शितल सुग्रीव नेटके , देवडी – विजयमाला अरुण झाटे, लोणवळ बाबी – मुक्ता अंकुश राठोड अशा एकुण 25 गांवाचे सरपंचासह सदस्य पदाचे निवडणुक निकाल जाहिर झाले आसून निवडून आलेल्या उमेदवारांनी विजयाचे गुलाल उडविले आहे.तर यावेळी पोलीसांचा चोखबदोबस्त ठेवण्यात आले होते.
शिवसेनेच्या दोन ग्रा.प.एकहाती सत्ता
वडवणी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जाणारी उपळी ग्रा.पं. या ठिकाणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास ढगे यांच्या पँनलनी विजयी गुलाल तर केंडेपिंप्री याठिकाणी युवा सेनेचे युवा नेते संजय धपाटे यांच्या पँनलाचा एकहाती सत्ता आली असून वडवणी तालुक्यात दोन ठिकाणी शिवसेनेनी झेंडा फडकविला आहे.