माजलगांव (रिपोर्टर)ः- माजलगाव तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींचा दुपारी निकाल हाती आला. त्यामध्ये 9 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला, 3 अपक्ष उमेदवारांनी गड काढला. तर 8 जागेवर भाजपाचे सरपंच विजयी झाले. यामध्ये मुंबई बाजार समितीचे चेअरमन अशोक डक यांचा उमेदवार तब्बल 110 मतांनी पडला तर माजलगाव बाजार समितीचे चेअरमन संभाजी शेजुळ यांनाही जबरदस्त धक्का बसला. त्यांचे सख्के बंधू 127 मतांनी पराभूत झाले.
विजयी सरपंच उमेदवार
देवखेडा-काशीबाई मस्के
शहापूर मांजरा-उज्वला नवनाथ आळणे
वाघोरा-आश्राबाई बादाडे
पिंपळगांव -कोमल कुंडलीक मायकर
सोनाथडडी-वंदना केरबा तपासे
बाभळगांव-सत्वशिला बाबुराव (तात्या) सुरवसे
ब्रम्हगांव- मिरा नारायण भले
जदीद जवळा-बळीराम यादव
सुरंग गाव- सारीका माने
लिमगांव -कृष्णा थावरे
नाकलगांव-मारोती विटेकर
राम पिंपळगांव-रामेश्वर चाळक
खरात आडगांव-अनुसया आडाव
मनुर-प्रतिक्षा तौरगले
केज तालुक्यातल्या 14 ग्रा.प.चे निकाल जाहीर
केज (रिपोर्टर)ः- तालुक्यामध्ये 64 ग्रामपंचायतीसाठी परवा मतदान झाल्यानंतर आजसकाळी मतमोजणीला सुरूवात झाली. दुपारपर्यंत 14 ग्राम पंचायतीचे निकाल हाती आले आहे. विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती झाल्या होत्या. मतदान झाल्यानंतर आज सकाळी मत मोजणीला सुरूवात झाली. दुपारपर्यंत 14 ग्रा.पं.चे निकाल हाती आले होते. जे उमेदवार विजयी झाले त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. दुपारी 1 वाजेपर्यंत या ग्रा.प.चे निकाल जाहीर झालेले होते.
1) टाकळी : संगीता आनंत घुले
2)ताबंवा : दिपाली अरुण चाटे
3)साबला : नरहरी शहाजी काकडे
4) कुंबेफाळ : अविनाश दिनकर पांचाळ
5) कळबअंबा :शशिकांत चाळक (अपक्ष)
6)नागझरी : चंदू चौरे
7) चंदनसावरगाव : अडसकर गट
8)दहीफळ :शशिकांत दहीफाळे
9)लव्हरी :मुन्ना चाळक
10)कोरेगाव : नागरगोजे दत्ता किसन
11)केकत सारणी : काळे अनिता शिवदास
12)नाव्होली :सौ.ईंदुबाई रंजीत बिक्कड
13)कासारी :अमोल धोडींराम डोईफोडे
14)ढाकेफळ:रतन मारुती अंधारे