Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना संभ्रमाच्या संसर्गाने निर्बंध कोमात

संभ्रमाच्या संसर्गाने निर्बंध कोमात


लोक रस्त्यावरच, जिल्ह्यात काही ठिकाणी निर्बंध असलेल्या दुकाना चालू
बीड (रिपोर्टर):- जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काल रात्री निर्बंधाबाबतचा आदेश जारी केल्यानंतर व्यापार्‍यांसह जिल्हावासियात संभ्रम कायम असून या संभ्रमाच्याच संसर्गाने शासनाचे निर्बंध कोम्यात गेल्याचे दिसून येत आहे. जमावबंदीचे आदेश धुडकावून लोक रस्त्यावर दिसत आहेत. अनेक ठिकाणी निर्बंध घातलेल्या दुकाना उघड्या आहेत तर काही ठिकाणी शेजारच्याने उघडले म्हणून आपण दुकान उघडले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा नेमका आदेश काय, हे कोणाला कळत नाही. अमलबजावणीबाबतही जिल्हा प्रशासन आज उदासिन दिसले तर दुसरीकडे छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांना लॉकडाऊन मान्य नसल्याने लोक आक्रमक असल्याचे पहावयास मिळाले.

a1 2


     मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवा शनिवार, रविवार संपुर्ण लॉकडाऊन तर अन्य दिवशी रात्री आठ ते सकाळी 7 संचारबंदी असा निर्णय जाहीर केला होता. मात्र त्यानंतर काल राज्य शासनाकडून कोरोनाची साखळी तोडण्याबाबत निर्बंधांची नियमावली जाहीर झाली. हीच नियमावली जिल्हा प्रशासनाने बीड जिल्ह्यासाठी लागू करत 15 एप्रिलपर्यंत निर्बंध काय असतील ते सांगितले. परंतु या निर्बंधाच्या नियमावलीने रात्रीपासून संभ्रम निर्माण झाला होता. तो आज दुपारपर्यंत कायम होता. बीड शहरातल्या बहुतांशी दुकाना बंद राहिल्या मात्र काही भागामध्ये निर्बंध घातलेल्या दुकानाही उघड्या असल्याचे दिसून आले. निर्बंधाना संभ्रमाचा संसर्ग जडल्याचे दिसून आले. बीड शहरासह जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही हाच संभ्रम कायम होता. अनेक ठिकाणी दुकाने चालू असल्याचे दिसून आले. जमाव बंदीचा आदेश असताना लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर फिरताना पहावयास मिळाले. प्रशासनाकडून निर्बंधाच्या अमलबजावणीकडे आज दुर्लक्ष होताना दिसून आले.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....