बीड (रिपोर्टर) ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सर्वाधिक 134 ग्रामपंचायतीपैकी 122 साठी झालेल्या मतदानात आज निकाल हाती आले तेव्हा दुपारपर्यंत जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचे वर्चस्व दिसून येत आहे. राजूरी ग्रा.पं.वर पुन्हा एकदा संदीप क्षीरसागरांनी आपलं वर्चस्व निर्माण केल्याचे पहावयास मिळत आहे. दुसरीकडे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडेही बहुतांशी ग्रामपंचायती आल्याचे पहावयास मिळत आहे. तर इकडे पिंपळनेर हे पुन्हा सतीश पाटील यांचेच असल्याचे पहावयास मिळाले आहे. याठिकाणी सतीश पाटील यांच्या सुनबाई सुलभा मनोज पाटील यांचा सरपंचपदावर दणदणीत विजय झाला तर त्यांच्या पॅनलचे सर्वच उमेदवार विजयी झाले. तालुक्यातल्या अन्य महत्वाच्या ग्रामपंचायतींचे निकाल हाती येणे बाकी आहे.
बीड तालुक्यात परवा झालेल्या ग्रा.पं. निवडणुकीमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार आ. संदीप क्षीरसागर यांच्या गटाचे वर्चस्व असल्याचे दिसून आले. ग्रामपंचायतीत एकूण 16 फेर्यांपैकी 7 फेर्यांचे निकाल लागले असून यामध्ये बहुतांश ग्रामपंचायती या आ. संदीप क्षीरसागर गटाकडे गेल्या आहेत. त्यामध्ये वडगाव गुंदाच्या सरपंचपदी गंगुबाई सुधाकर नागरगोजे, सांडरवणच्या सरपंचपदी बंडु लांडे, नाथापूरच्या सरपंचपदी सुंदर मदन चव्हाण, कुक्कडगावच्या सरपंचपदी ज्ञानेश्वर शिंदे, ताडसोन्नाच्या सरपंचपदी जयश्री सोमनाथ वडमारे, पिंपळादेवीच्या सरपंचपदी दत्ता बाबासाहेब पिवणे, बोरदेवीच्या सरपंचपदी आर्सूळ सुशिला महादेव, मानूरवाडी शिला ज्ञानेश्वर जोगदंड, जुजगव्हाणच्या सरपंचपदी रवी गव्हाणे, जरुडच्या सरपंचपदी श्रीराम काकडे, वलीपूरच्या सरपंचपदी रामेश्वर बन्सीधर घुमरे, मन्यारवाडीच्या सरपंचपदी सुवर्णा भिक्कू शिंदे, हिवरापहाडीच्या सरपंचपदी अशोक शिंदे, मांजरसुंब्याच्या सरपंचपदी मनिषा अरुण रसाळ, अंधापूरच्या सरपंचपदी मनीषा पप्पू जाधव, वांगीच्या सरपंचपदी अशोक वाघमारे, भवानवाडीच्या सरपंचपदी गणेश बाबा जगताप, शिवणीच्या सरपंचपदी अजय सुपेकर, पिंपळनेरच्या सरपंचपदी सुलभा मनोज पाटील, ईटच्या सरपंचपदी गणपत डोईफोडे, रुद्रपूरच्या सरपंचपदी अनुसया गिते, केतुर्याच्या सरपंचपदी परमेश्वर नाना तळेकर हे जनतेतून बहुमताने विजयी झाले आहेत. यातील एक ग्रामपंचायत शिवसंग्रामकडे तर एक ठिकाणी शिवसेनेचे अनिल जगताप यांच्या गटाकडे गेली आहे. ती ग्रामपंचायत म्हणजे केतुरा ग्रामपंचायत होय. काही ग्रामपंचायती या जयदत्त क्षीरसागर गटाकडेही गेल्या आहेत. मात्र त्यांची सख्या कमी आहे. बीड तालुक्यातील 122 ग्रा.पं.चे सर्व निकाल हाती येण्यासाठी दुपारी पाच वाजतील. विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला.
20 ग्राम पंचायत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात
बीड (रिपोर्टर)ः- सकाळपासून ग्रा.प.मतमोजणीला सुरूवात झाली.यामध्ये दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालात बीड आणि शिरुर तालुक्यातील 20 ग्रामपंचायत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या होत्या. यामध्ये बीड तालुक्यातील ईट, साक्षाळपिंप्री, पारगांव सिरस, काठोडा, बर्हाणपूर, काळेवाडी, अंबेसावळी, जुजगव्हाण, काळेगांव हवेली, जरुड, सांडरवण, पिंपळादेवी यासह इतर ग्रामपंचायतीवर जयदत्त क्षीरसागर यांचे वर्चस्व राहीले आहे.