बीड (रिपोर्टर) बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना गेल्या आठ दिवसापूर्वी घडली. याप्रकरणी काल पिडीतेने बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात बलात्कारासह अॅट्रासिटी आणि पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणार्या एका 17 वर्षीय मुलीवर त्याच गावातील आरोपी अमोल ढेरे याने बलात्कार केल्याची घटना गेल्या आठ दिवसापूर्वी घडली होती. याप्रकरणी काल पिडीत तरूणीने बीड ग्रामीण पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीविरोधात आरोपी ढेरेविरोधात बलात्कार, पोस्कोसह अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डिवायएसपी संतोष वाळके हे करत आहेत.