Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना दवाखाना चांगला, व्यवस्था चांगली, प्रशासन चांगलं मग मृत्यूदर का वाढतोय, केंद्राच्या पथकाने...

दवाखाना चांगला, व्यवस्था चांगली, प्रशासन चांगलं मग मृत्यूदर का वाढतोय, केंद्राच्या पथकाने व्यक्त केली चिंता


बीड (रिपोर्टर):- दवाखाना चांगला, व्यवस्था चांगली, उपचार करण्याची प्रक्रियाही व्यवस्थीत, प्रशासन चांगलं काम करतय मग बीड आणि अंबाजोगाई रुग्णालयातला मृत्यूदर का वाढतोय? या चिंतेत केंद्राचे पथक दिसून आले. आज सायंकाळी या पथकातील डॉ. रक्षा कुंदल आरोग्य प्रशासनासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी बैठक घेऊन ज्या त्रुटी आढळल्या आहेत त्याची माहिती देत मृत्यूदर रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहेत.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल
https://t.me/beedreporter

केंद्र सरकारचे दोन सदस्यीय पथक बीडमध्ये डेरेदाखल होत आहे. पथकातील डॉ. रक्षा कुंदल या रात्री बीडमध्ये दाखल झाल्या. पथकातील अन्य सदस्य डॉ. कुशावाह हेही बीडमध्ये डेरेदाखल होत आहेत. केंद्र सरकारने कोरोना बाबतचा जिल्हानिहाय अहवाल मागवला आहे त्याची पाहणी करण्यासाठी कुंदल या बीडमध्ये आल्या. आज सकाळी त्यांनी जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट दिली.

170683726 1825674257588005 2181545707803233607 n

या वेळी त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्तेंसह महसूल अणि आरोग्य विभाागचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. स्वत: डॉक्टर असल्याने रक्षा कुंदल पीपी किटसह रुग्णालयातील रुग्णांपर्यंत गेल्या. कोविड वॉर्डातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या बाबीची त्यांनी पाहणी केली. औषधोपचार कसा केला जातो, ऑक्सिजनचा योग्य पुरवठा आहे का, गंभीर आणि अतिगंभीर रुग्ण कसा हाताळला जातोय यासह अन्य व्यवस्थेची पाहणी केली. त्या वेळी दवाखाना चांगला आणि सुंदर दिसला.

434

व्यवस्थाही चांगली होती, उपचारही चांगले केले जातात, ऑक्सिजनची कमतरता नाही मग असे असताना बीड, अंबाजोगाई कोविड रुग्णालयात मृत्युदर का वाढतोय ? या प्रश्‍नचिन्हात अडकलेल्या डॉ. कुंदल यांना पत्रकारांनी अडवले असता मला माध्यमांशी बोलण्याचा अधिकार नाही परंतु आपण एवढ्या संख्येने उपस्थित आहात, मी एवढच सांगेन, रुग्णालयात सर्व व्यवस्था चांगली आहे, कोरोनाची परिस्थिती प्रशासन चांगल्या पद्धतीने हाताळतय परंतु जिल्ह्याचा मृत्युदर का वाढतोय? यावर आज दुपारी चार वाजता बैठकीमध्ये चर्चा केली जाईल. मृत्युदर रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याकडेही गांभीर्याने पाहितले जाईल. चार दिवसांमध्ये जिल्ह्याचा कोविड अहवाल केंद्र सरकारला सादर करावयाचा आहे.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....