बीड (रिपोर्टर) थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारने मद्यविक्रीला खुली सुट देत 31 डिसेंबर रोजी राज्यभरातील दारू दुकानांसह बारला मध्यरात्री एक वाजेपर्यंत तर पबला पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे मद्यपींना थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मद्य आधीच विकत घेण्याची गरज नाही. सदरचे आदेश बीड जिल्ह्यासाठीही लागू असणार असून दारू दुकाने एक वाजेपर्यंत तर उत्सव पहाटे पाच वाजेपर्यंत साजरा करता येणार आहे.
चार दिवसांवर नवीन वर्ष आले आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी आपआपल्या परीने आयोजन-नियोजन केले आहे. नव्या वर्षाचं स्वागत उत्साहात साजरा करण्यात यावं, यासाठी राज्य सरकारने मद्यविक्रीला खुली सुट दिली आहे. पुणे, मुंबई सह अन्य मोठ्या शहरांमध्ये पहाटे पाच वाजेपर्यंत पब सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे तर मध्यरात्री एक वाजेपर्यंत दारू दुकाने उघडी ठेवता येणार आहेत. बीड जिल्ह्यातही मध्यरात्री एक वाजेपर्यंत दारू दुकाने उघडी असणार असून बार, धाबे यांना दारूविक्रीसाठी एकतर उत्सव साजरा करण्यासाठी पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. रात्री दहानंतर जाहीर कार्यक्रम बंद ठेवली जातात मात्र थर्टी फर्स्टला पहाटे पाच वाजेपर्यंत उत्सवादरम्यान शासनाचे नियम पाळून जल्लोष साजरा करता येणार आहे.