बीड (रिपोर्टर) बापाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने नैराश्ये आलेल्या एका 15 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी अकरा वाजता तलवाडा येथे घडली.
सार्थक महेंद्र मरकड ऊर्फ छोट्या (वय 15 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. सार्थकचे वडील महेंद्र वरकड यांना चार एकर शेती आहे. मात्र त्यांच्याकडे खासगी सावकारासह बँकेचे कर्ज आहे. या कर्जापायी घरात रोज कुरबुरी होत होती. नेहमी सावकार दारात येत होता. घरात पैसे नसल्याने रोजच्या भांडणाला कंटाळून सार्थकने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी अकरा वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.