जिल्हा रुग्णालयात वर्षभरात 3 लाख रुग्णांनी घेतले उपचार
एक हजार छोटे तर 8 हजार झाले मोठे ऑपरेशन
496 जणांना साप चावला, 800 रुग्णांनी रेबिज घेतले
बीड (रिपोर्टर) जिल्हा रुग्णालयामध्ये दररोज विविध रुग्ण उपचार घेत असतात. वर्षभरात 2 लाख 99 हजार 791 रुग्णांनी उपचार घेतले. 1290 छोट्या शस्त्रक्रिया झाल्या तर 8868 मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 436 रुग्ण सर्पदंश झालेले आले होते. 8250 रुग्णांनी रेबिजचे इंजेक्शन घेतले. अपघातासह इतर आजारांनी वर्षभरात 550 जण दगावले आहेत. जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी विशेष सुविधा निर्माण करण्यात आल्या असून ग्रामीण भागातून जास्तीत जास्त प्रसुतीसाठी रुग्णालयात येतात. वर्षभरात 9031 महिलांची नॉर्मल डिलेव्हरी झाली तर 3300 महिलांचे सिझर करण्यात आले.
सर्वसामान्यांसाठी जिल्हा रुग्णालय फायद्याचे असते. रुग्णालयात उपचारासाठी पैसे लागत नाहीत त्यामुळे जास्तीत जास्त रुग्ण सरकारी दवाखान्यात उपचार घेतात. वर्षभरात 2 लाख 99 हजार 791 रुग्णांनी उपचार घेतले. 1 लाख 12 हजार 790 रुग्ण अॅडमिट झाले होते. जिल्हा रुग्णालयात छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया दररोज होतात. 1 हजार 290 छोटे, तर 8868 मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. 30 हजार 399 रुग्णांची सोनोग्राफी करण्यात आली. 4 हजार 707 रुग्णांचे सिटीस्कॅन करण्यात आले. 13772 रुग्णांची ईसीजी करण्यात आली. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिला प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयात येत असतात. 9031 महिलांची नॉर्मल डिलेव्हरी झाली. 3379 महिलांचे सिझर करण्यात आले. 436 रुग्ण साप चावलेले आले होते. 74 रुग्ण विंचू चावलेले दाखल झाले होते. कुत्रा चावल्यानंतर रेबिजचे इंजेक्शन घेणे गरजेचे आहे. 8250 रुग्णांनी सदरील हे इंजेक्शन घेतले आहे. 5882 एमएलसी झाली. 57 हजार 244 रुग्णांचे लॅब टेस्ट करण्यात आले. अपघातासह इतर आजारांमुळे 550 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान रुग्णांवर वेळेत उपचार करण्याचे काम डॉ. सुरेश साबळे, आरएमओ संतोष शहाणे, मेट्रन रमा गिरी, प्राचार्या सुवर्णा बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील सर्व स्टाफ करत असतो.