बीड (रिपोर्टर) चोरीचा आरोप लावल्याच्या कारणावरून 22 वर्षीय तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील वसंतनगर तांड्यात घडली. या प्रकरणी दोषींविरोधात कारवाई करावी, अशी मागणी मयताच्या घरच्यांनी केली आहे.
विकास गणेश जाधव (वय 22 वर्ष) या तरुणावर चोरीचा आरोप करण्यात आला होता. यातून त्याने काल विषारी औषध प्राशन केल्याने त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोषी लोकांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मयताच्या घरच्या लोकांनी पोलिसांकडे केली.