अग्रलेख -कलियुगी भुजंगांचा इतिहासाला विळखा
गणेश सावंत -9422742810
अन्याय अत्याचाराच्या काळ्याकुट्ट अंधारात पारतंत्र्याच्या साखळदंडाने जखडून ठेवलेल्या मराठी मुलखाला स्वातंत्र्य मिळविण्याचे स्वप्न पाहणार्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब आणि स्वातंत्र्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवत स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज तेच स्वराज्य तलवारीच्या टोकावर विस्तारीत करणारे छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या कर्तृत्वकर्मातून निर्माण झालेल्या धगधगत्या इतिहासाला काही लोक नख लावण्याचा प्रयत्न करत आले आहेत. आजपर्यंत हे पाप तथाकथीत धर्ममार्तंडांनी आणि क्षत्रियांनाही शुद्राची वागणूक देवू पाहणार्यांनी केले. परंतू आता तथाकथीत महापंडीत लेखक अभ्यासक यापेक्षाही आपण किती वरचढ आहोत आणि आपल्यालाच याचा किती अभ्यास आहे याचा देखावा निर्माण करणारे राजकारणी वड्यावगळीला निपजल्यागत थेट छत्रपतींच्याच कर्तव्यकर्माला आणि त्यांच्या कर्तव्यकर्माच्या धर्माला, शौर्याला नख लावतात तेव्हा महाराष्ट्राच्या मातीत निपजलेल्या प्रत्येकाला संताप येणारच. छत्रपतींचं स्वराज्य हे ‘सर्वास पोटास लावणे आहे’ या ब्रिदावर उभारलेले होते. कोण कुंच्या जातीचा, कोण कुंच्या धर्माचा यापेक्षा तो स्वराज्याचा पाईक आहे आणि तो स्वराज्यासाठीच जीतो आणि मरतो आहे तो खरा धर्म माननार्या राजमाता जिजाऊंपासून छत्रपती शंभूराजेंपर्यंतच्या महान विभूतींवर भाष्य करणे अथवा त्यांची इतरांशी तुलना करणे हे महापातकच. आजपर्यंत ज्यांनी शंभूराजेंना व्यसनी ठरवून टाकले त्यांचेच काही पिलावळे शंभूराजेंसह छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना आज कालच्या तुटपुंज्या नेतृत्वाशी करतात अन् महाराष्ट्राचा आणि शिवाजी महाराजांचा ‘सर्वास पोटास लावणे आहे’ या धर्माला बाजूला ठेवतात, बगल देतात तेव्हा अशा राज्यकर्त्यांची किव येते.
संभाजीराजे धर्मवीर की स्वराज्य रक्षक
यावर सध्या महाराष्ट्रात रान उठले आहे. संभाजी राजे धर्मवीर नव्हते ते स्वराज्य रक्षक होते अशा आशयाचं वक्तव्य गेल्या काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजीत पवारांनी केले अन् इथंच कलयुगातल्या भुजंगांना महत्त्वपुर्ण विषयांना बगल देण्याचे कारण मिळाले. आपला धर्मांधतेचा विळखा अधिक मजबूत करण्याइरादे अजीत पवारांनी हिंदू धर्म बुडवला हो या आवेशात आजकालच्या तथाकथीत पंतांनी आरोळी ठोकली. भाजपाच्या नेत्यांनी संभाजी राजेंना स्वराज्य रक्षक म्हटले म्हणून जणू काय धर्म बुडालाय असा आवेश दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपाच्या याच नेत्यांना धर्म बुडाल्याची अथवा छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना केल्याचा संताप तेव्हा आला नाही, जेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांविषयी वक्तव्य केले, फुले-शाहू-आंबेडकरांविषयी वक्तव्य केले. भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराजांविषयी वक्तव्य केले. महाराष्ट्रातले अनेक भाजपाचे नेते बरगळले तेव्हा याच भाजपाच्या अणाजी पंतांना अथवा मम्बाजी बुवांना त्याचा राग आला नाही. दुर्दैवं याचं वाटत छत्रपती शिवाजी महाराज असोत अथवा संभाजी महाराज असोत यांनी स्वराज्य निर्माण करताना आपल्या डोळ्यावर जो चष्मा ठेवला आणि त्या चष्म्यातून स्वराज्यातील रयतेला ज्या पद्धतीने पाहितले ते अधिक महत्त्वाचे. जर छत्रपती शिवाजी महाराज अथवा शंभूराजे हे जाथ्यांद होते, कर्मंठ हिंदूवादी होते तर आम्हाला तरी वाटते त्यांच्याकडे मुसलमान सरदार अथवा अंगरक्षक नसते. तेव्हाची लढाई ही धर्माची नव्हती तर अन्याय अत्याचाराविरूद्धची होती. पारतंत्र्याच्या साखळदंडात जखडलेल्या रयतेला मुक्त करण्याची होती. रयतेत स्वाभिमान निर्माण करून देण्याची होती. मात्र आज त्याच स्वराज्य रक्षक आणि स्वराज्य निर्मात्यावर ते कडवट हिंदूत्ववादी होते की निधर्मवादी होते यावर भाष्य केले जातेय तेव्हा आजकालच्या राजकारण्यांची किव आल्याशिवाय राहत नाही. संभाजीराजेंना धर्मवीर म्हणणे हे चुकीचे नाही, याबाबतही आमचे दुमत नाही परंतू
आजचा काळ आणि मध्यंयुग काळ
याचा मेळ जमवताना राजकारण्यांनी नक्कीच भान राखले पाहिजे. छत्रपतींच्या कर्तृत्वकर्माचे धार्मिक दाखले बहिवर्काच्या भिंगातून शोधून लोकांच्या माथी मारण्यापेक्षा छत्रपतींचे स्वराज्याविषयी असलेले प्रेम स्वराज्यातील रयतेविषयी असलेली भावना स्वराज्याविषयी असलेली एकनिष्ठता, त्यांचे कर्तव्यकर्म, स्वराज्यातील रयतेला दिल्या जाणार्या मुलभूत सुविधा, दिनदुबळ्यांची सुरक्षा, महिलांच्या ब्रुबाबत दक्षता, गुन्हेगाराला कठोर शिक्षा, भ्रष्टाचार्याचा कडेलोट याकडे अधिक लक्ष देत छत्रपतींनी पाणलोट बाबत केलेले कार्य, शेतीबाबत केलेले कार्य, स्वराज्याची रचना, सुरक्षा आणि खास करून राज्याच्या कारभारात बसल्यानंतर राज्यासोबत असलेले इमान राखणं हे आजच्या राज्यकर्त्यांनी आणि विरोधकांनी शिकून घ्यायला हवं. उगाच एखाद दुसर्या घटनेला हवा देत कुणाला धर्मरक्षक म्हणायचं नाही किंवा स्वराज्य रक्षक म्हणायचं नाही यातून वाद निर्माण करायचा, कुठला धर्म श्रेष्ठ आणि कुठला धर्म शुद्र हे दाखवून द्यायचे हे आजच्या पिढीला न शोभणारे, विज्ञानाच्या युगात मागासपणाचे लक्षण असणे म्हणावे लागेल. संभाजी महाराजांची भुमिका त्यांचे 32 वर्षातल्या कालखंडातले कर्तव्यकर्म एखाद्या धर्मात अडकवणे हा शंभूराजांवरचा सर्वात मोठा अन्याय असेल. शंभूराजेंनी वयाच्या 14 व्या वर्षी जे प्रभूत्व दाखवलं आणि त्या प्रभूत्वातून बुद्धभुषण ग्रंथासह अन्य तीन ग्रंथ लिहून दाखवले, अनेक भाषेवर प्रभूत्व ठेवलं ते प्रभूत्व आजकालच्या पाखंड्यांना कधीही जमणार नाही. महाराजांना नक्कीच धार्मिक परंपरेचा प्रचंड अभिमान होता, त्यामुळे ते जसे स्वराज्य रक्षक होते तसे ते धर्मवीर देखील होते. आजच्या काळातील धर्मनिरपेक्ष आणि निधर्म संकल्पना मध्ययुगीन काळातील महापुरुषांवर लादणे हे अनऐतिहासिकच, निधर्मी किंवा पुरोगामी या आधुनिक किंवा आजकालच्या संकल्पना आहेत. त्या मध्ययुगी नाहीत त्यामुळे आजच्या संकल्पना इतिहासावर लादणे हा बद्मुर्खपणाच. आम्ही भाग्यशाली, आमचा जन्म महाराष्ट्राच्या मातीत झाला. ही माती राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेबांची जणू कुस, अन् तिथंच शंभूराजे अथवा छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आजही अणाजी पंत किंवा रांजेगावचे पाटलं बदसलूखी करत असतील तर छत्रपतींचे पाईक त्यांना माफ करणार नाहीत.
छत्रपती संभाजीराजेंच्या बुद्धभुषण
मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर आणि अलंकारीत भाषेत वर्णन शंभूराजेंनी केलंय. ते म्हणतात.
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्र विक्लवं र: ।
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजरत्रजेर: ॥
अर्थ-कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा, करितो धर्माचा र्हास तारण्रा वसुधा अवतरला जगत्पाल, त्रा शिवप्रभूंची विजरदुंदुभी गर्जू दे खास ॥
या वर्णनातून मध्यंयुग काळातील इतिहास शंभुराजेंची भुमिका जशी धर्मवेधक पाहायला मिळते तशीच त्यांचे 32 वर्षातल्या कालखंडातले कर्तव्यकर्म हे स्वराज्य निष्ठेचे पहायला मिळते. स्वराज्य रक्षक म्हणून निधड्या छातीने झुंजणार्या शंभूराजांच्या 120 लढाया लढल्याचे आपण पाहिल्या तर त्यातून धर्म रक्षकापेक्षा स्वराज्य रक्षक शंभुराजे तुम्हा आम्हाला दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने स्वत: रणांगणात उतरून लढाई केली, त्या पद्धतीनेच शंभुराजांनी एक नव्हे दोन नव्हे 120 लढाया केल्या त्या स्वराज्यासाठी आणि या 120 लढायामधील एकही लढाई शंभुराजे हरले नाहीत हे विशेष. त्यामुळे स्वराज्य रक्षक ही ब्रिदावली जर कोणी शंभुराजेंना देत असेल तर ती ब्रिदावली धर्मरक्षकाबरोबर स्वराज्य रक्षक ही ब्रिदावली सरस असेल यात दुमत असण्याचे कारण नाही. परंतू
आजचे अणाजी आणि मम्बाजी
उफटसुंबेपणा करतातच, छत्रपती शिवाजी महाराजांना अपमानित करणारे शब्दप्रयोग भाजपेयांनी केले, त्यांचे राजीनामे भाजपेयीयांनी मागितले नाहीत परंतू अजीत पवारांनी एक वक्तव्य केलं अन् आजच्या अणाजी आणि मम्बाजींना तोंड सुटलं. शंभुराजेंचे वडिल आणि आज्जी धर्मनिरपेक्ष कशा होत्या हे सांगायचे असेल तर शब्द संपतील, कागद संपेल परंतू तरीही एक उदाहरण या ठिकाणी आम्ही देतोय. पुणे परगण्यात मुरार जगदेव नावाच्या सरदाराने उभी पहार रोवून त्यावर फाटकी चप्पल बांधली होती, येथे जो पेरा करील, येथे जो जमीन कशील तो निर्ववंश होईल अशी अंधश्रद्धा त्या मागची मात्र राजमाता जिजाऊ मॉसाहेबांनी ती पहार उपटून फेकली आणि शिवाजी महाराजांच्या हाती सोन्याचा नांगर देवून पुणे परगण्याची ती जमीन कसली. कधी शुद्रांना छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीच्या पालखीला खांदा देण्याचा मान दिला. तर कधी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले अंगरक्षक हे मुसलमान ठेवले हे सत्य नाकारता येणार नाही. ते धर्मनिरपेक्ष होते, ते स्वराज्य रक्षक होते यापेक्षा त्यांचे कर्तृत्वकर्म अजरामर आहे हे सुर्यप्रकाशाइतके खरे हे सांगायचीही गरज नाही.