बीड (रिपोर्टर) ऊसतोडणीसाठी आलेल्या एका 22 वर्षीय तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळच्या दरम्यान घडली. या प्रकरणी दोषींविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मयताच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात चांगलाच गोंधळ घातल्याने पोलिसांनी रुग्णालय परिसरात बंदोबस्त लावला होता.
दीपक सुभाष काळे (वय 22 वर्ष) हा मजूर पिंपळनेर परिसरातील काळेगाव येथे ऊसतोडणीसाठी आलेला होता. त्याने काल उसाच्या फडातच विेषारी औषध पिऊन आत्महत्या केली. या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या दोषींविरोधात कारवाई करावी यासाठी मयताच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय परिसरात गोंधळ माजवला होता. पोलिसांनी हा गोंधळ पाहता बंदोबस्त लावला होता. आज सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.