Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाराज्य केंद्रापुढे हतबल; हात जोइून विनंती करतो, आता तरी मदत करा :...

राज्य केंद्रापुढे हतबल; हात जोइून विनंती करतो, आता तरी मदत करा : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई (रिपोर्टर):- राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरुच असून दिवसागणिक कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. केंद्राने केवळ 26 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देणार असल्याचे सांगितले आहे. मात्र महाराष्ट्राला 36 हजार इंजेक्शनची आवश्यकता आहे. मी राज्यातील जनतेसाठी केंद्राच्या पाया पडतो, हात जोडतो. आता तरी मदत करा,अशा शब्दात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारला आज साकडे घातले.
माध्यमांशी बाोलताना टोपे म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लस असो की रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरावठा किंवा ऑक्सिजन सर्व नियंत्रण केंद्र सरकारच्या हातात आहे. मात्र अजूनही हवा तितका पुरवठा केंद्राकडून होत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री यांना राज्यातील कोरोनाची स्थितीची माहिती देत लसीसह रेमडेसिविर आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्याची मागणी केली आहे. राज्याने केंद्राकडे 60 हजार रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी केली असताना केवळ 26 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देणार असल्याचे केंद्राने सांगितले आहे. केंद्राच्या या निर्णयामुळेच राज्यासमोरील आव्हाने वाढली आहेत, असेही ते म्हणाले. कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे लसीचा पुरवठा होत नाही. लसीसंदर्भातील सर्व निर्णय केंद्राकडे आहेत. राज्याला यात काहीच करता येत नाही. राज्याने लसीसाठी उत्पादक कंपन्यांकडे मागणी केली आहे. मात्र केंद्राने पुढील एक महिन्याची मागणी केली आहे. त्यामुळेराज्यातील 18 ते 45 वयोदरम्यान असणार्‍यांसाठी या महिन्यात तरी लस देता येणार नाही, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. इतर कंपन्यांची लस ही महाग असून त्या त्या उत्पादक कंपन्याकडे किंमतींच्याबाबतीत बोलणे सुरू असल्याचेही टोपे यांनी सांगितले.  

राज्यातील लस कोणाला द्यायची, गरीब जनतेसाठी लस देताना कोणते निकष असावेत, याबाबत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल; पण ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्यांनी लस विकत घ्यावी, असे आवाहनही टोपे यांनी केले. चिंताजनक प्रकृती असणार्‍यांनाच रेमडेसिवीर इंजेक्शनचा देण्यात यावे, असा पुन्नरुच्चारही त्यांनी केला. विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असेही टोपे म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!