मोहनराव जगताप यांच्या पुतण्याचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी
माजलगाव (रिपोर्टर) :- येथील भाजपा नेते मोहनराव जगताप यांचे पुतणे विश्वजीत जीवनराव जगताप यांचा रात्री गेवराईजवळ अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री बाराच्या दरम्यान घडली.
माजलगाव येथील छत्रपती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जीवनराव जगताप यांचे चिरंजीव विश्वजीत जगताप (वय 22) हे काही कामानिमित्त औरंगाबादला गेले होते. काम आटोपून माजलगावकडे येत असताना गेवराईजवळ त्यांच्या गाडीने ( एम एच 44 टी 5152) कंटेनरला पाठीमागून धडक दिली. शुक्रवारी रात्री बाराच्या दरम्यान ही घटना घडली. यात विश्वजीत जगताप यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. विश्वजीत जगताप यांच्या पश्चात आई-वडील दोन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्य अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अन्य एक जण जखमी असल्याचे समजत आहे. दरम्यान हा अपघात घडला त्यावेळी विश्वजित जगताप हे स्वतः गाडी गाडी चालवत होते. मात्र त्यांनी सीट बेल्ट लावला नसल्याने त्यांना जबर मार लागला. तर त्यांच्या बाजूच्या सीटवर असलेल्या आर्यन कंटुले यांनी सीट बेल्ट लावला असल्याने ते या अपघातातून बचावले असल्याचे बोलले जात आहेत.