Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाग्रामीण भागात आरोग्य विभागाकडून कोरोनाच्या चाचण्या, चिंचोलीमाळी, आडस, बनसारोळा, मस्साजोगमध्ये 500 पेक्षा...

ग्रामीण भागात आरोग्य विभागाकडून कोरोनाच्या चाचण्या, चिंचोलीमाळी, आडस, बनसारोळा, मस्साजोगमध्ये 500 पेक्षा जास्त निघाले रुग्ण

केज (रिपोर्टर):- शहरीभागानंतर ग्रामीण भागात कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली. ग्रामीण भागातला कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य प्रशासन जोमाने कामाला लागलेला आहे. चिंचोलीमाळी, आडस, बनसारोळा, मस्साजोग या चार गावात कोरोनाचे जवळपास 500 पेक्षा जास्त रुग्ण निघाले होते. त्यामुळे या गावातील नागरिकांच्या चाचण्या करण्यत आल्या. इतर गावातही कोरोना चाचणी करण्यात आली असून नागरिकांनी बाहेर फिरू नये आणि मास्कचा वापर करावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आठवले यांनी केले आहे.
   गेल्या पंधरा दिवसांपासून बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने याचा आरोग्य प्रशासनावर मोठा ताण पडू लागला. केज शहरानंतर ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. एका-एका गावात शंभरापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. चिंचोलीमाळी, आडस, बनसारोळा, मस्साजोग या गावांमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे सदरील गावातील नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. इतर गावातही कोरोना चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी सतर्क रहात, थोडाही त्रास जाणवला की तात्काळ रुग्णालयात दाखवून घ्यावे आणि विनाकारण बाहेर फिरू नये, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आठवले यांनी केले आहे

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!