बीड (रिपोर्टर) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. सदरील हे काम दर्जेदार करण्यात यावे, या मागणीसाठी आज शिवप्रेमींनी पुतळ्यासमोर आंदोलन केले. या वेळी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यासह आदींची उपस्थिती होती. सदरील हे काम शिवप्रेमींनी बंद केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पुर्वी पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम करण्यात येत आहे. सदरील हे काम दर्जेदार होत नसून, कामाचा दर्जा चांगला ठेवावा या मागणीसाठी आज शिवप्रेमींनी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते. या वेळी शिवप्रेमींनी काही मागण्या केल्या आहेत. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणाचे काम सुरू असून या कामाचे थ्रीडी इलेव्हेशन काढलेले नसल्यामुळे ते कामानंतर कसे दिसेल हे कळत नाही. कंपाऊंडचे काम ग्रील बसवून करणार आहात, त्याऐवजी संभाजीनगर येथील पुतळ्याप्रमाणे दगडी बांधकाम केल्यानंतर कसे दिसेल, दोन्ही ग्रील व दगडी बांधकाम याचे थ्रीडी इलेव्हेशन काढून त्यापैकी कोणते चांगले दिसेल हे तपासूनच काम करावे तसेच महाराजांच्या पुतळ्यास हार घालण्यासाठीची हायड्रोलीक शिडी तात्काळ दुरुस्त करावी, तसेच पुतळ्यासमोर जे देखावे तयार केलेले आहेत त्यासमोर फेरीवाले थांबतात त्यांना तेथे थांबण्यास प्रतिबंधित करावे, जोपर्यंत या कंपाऊंड वॉलच्या दोन्ही थ्रीडी इलेव्हेशन तयार करून त्यापैकी एक मान्य करावी व मगच काम चालू करावे, अशा मागण्या करण्यात आल्या. या वेळी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, शेख निजाम, सुनील सुरवसे, नितीन धांडे, कुंदाताई काळे, विठ्ठल बहीर, संतोष जाधव, संगमेश्वर आंधळकर, किशोर गिराम, जाधव, गुजर, पठाण, गणेश मस्के, संगिता चव्हाण, आशिष मस्के, गोरख शिंगण, सुनील अनभुले, शामराव पडुळे, मशरू पठाण, बापुसाहेब साळुंके, रतन गुजर, छगनराव काळे, रवी शिंदे, जयंत वाघ, अमोल कोरडे, युवराज मस्के, विलास बिक्कड, अशोक नाईकवाडे, दत्ता शेळके, भागवत बादाडे, गणेश लोणकर, हनुमान बहिरवाळ, नंदु येवले, शेख खमर, भारत मनेरी, शेख अशफाक, मोमीन जानीभाई, शेख अझहर, जयराम कळसे, शरद पवारसह आदींची उपस्थिती होती.