Saturday, July 24, 2021
No menu items!
Homeकोरोनाशासकीय आयटीआयमध्ये दोनशे बेडचे ऑक्सिजन हॉस्पिटल लवकरच कार्यान्वित

शासकीय आयटीआयमध्ये दोनशे बेडचे ऑक्सिजन हॉस्पिटल लवकरच कार्यान्वित


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्हा रूग्णालयाचे सर्व वार्डात कोरोना रूग्ण खचाखच भरलेले आहेत. शहरात आणि जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. खासगी हॉस्पिटलमध्येही रूग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाच्या वतीने शासकीय आयटीआयमध्ये कोव्हिड सेंटर अगोदरच सुरू असले तरी याच आयटीआयमध्ये 200 बेडचे ऑक्सिजनयुक्त हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने उभारण्यात येत असून ते दोन दिवसात कार्यान्वित होत आहे.


जिल्हा रूग्णालयातील सर्व वार्डासोबत नर्सिंग कॉलेज मुलींच्या वसतीगृहामध्ये कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्हा रूग्णालयाचे सर्व वार्ड कोरोना रूग्णाने खचाखच भरलेले आहेत. ज्यांच्याकडे पैसे द्यायची आयपत आहे असे रूग्ण खासगी रूग्णालयात भरती होत आहेत. तर खासगी रूग्णालयातील काही खाटा या महात्मा फुले जीवन आरोग्य योजने अंतर्गत कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. हे सर्वच कमी पडत असल्यामुळे रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील शासकीय आयटीआयमध्ये 200 बेडची ऑक्सिजनयुक्त हॉस्पिटल गेल्या काही दिवसापासून उभारण्यात येत होते. याचे काम दोन दिवसात पुर्ण होवून ते रूग्णाच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. त्यामुळे या रूग्णालयात गरजु रूग्णांना उपचार करण्यात येणार आहेत.

Most Popular

error: Content is protected !!