गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील राजापूर शिवारात शेतकर्यांच्या शेतातुन सतत काही न काही चोरीच्या घटना सातत्याने घडत
असून चोरट्यांनी आता शेतकर्यांचे विद्युत पंप व सोलार पंप टार्गेट केले असून मागील महिनाभरात अनेक शेतकर्यांचे पंप लंपास केले आहेत.
राजापूर परिसरात शेतातील काही न काही चोरीच्या घटना सतत सुरू असतात नुकतेच आता कापूसाचा सिझन कमी झाल्यानंतर चोरट्यांनी आता आपला मोर्चा विद्युत पंप चोरीकडे वळवला असून गेल्या चार दिवसांपूर्वी या परिसरातील बेलगुडवाडी येथील रहिवासी असलेले रोहिदास बाबुराव दरेकर यांच्या बोअरमधील सोलार पंप लंपास केला असून याबाबत सविस्तर तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून अद्याप कुठलीच हालचाल झाल्याचे दिसून येत नाही. दरम्यान मागील महिनाभरात या परिसरात चोरट्यांनी अनेक शेतकर्यांचे विद्युत पंप व सोलार पंपवार डल्ला मारला असून पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.