केज (रिपोर्टर) अज्ञात चोरट्यांनी मोबाईल कंपनीच्या टॉवरवरील 27 हजार रुपयांचे केबल वायर चोरून नेल्याची घटना गप्पेवाडी ( ता. केज ) येथे घडली.
गप्पेवाडी ( ता. केज ) येथे जिओ मोबाईल कंपनीचे टॉवर आहे. 17 जानेवारी रोजी पहाटे हे टॉवर बंद पडले होते. त्यानंतर टॉवरची पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी टॉवरचे 27 हजार रुपये किंमतीचे केबल वायरचे 9 नग चोरून नेल्याचे निदर्शनास आले. टॉवरचे सुपर वायझर आकाश प्रकाश गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. जमादार उमेश आघाव हे तपास करत आहेत.
केज तालुक्यात भुरट्या चोर्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दररोज शहरासह तालुक्यात कुठे ना कुठे चोरीची घटना घडू लागली आहे. काही भामटे नागरिकांना विविध प्रलोणे दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळू लागले आहे. या भुरट्या चोरांचा केज पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.