अनेक वर्षानंतर महामंडळाला दिला शासनाने निधी
एक लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार
बीड (रिपोर्टर)ः- गेल्या अनेक वर्षापासून अण्णा भाऊ साठे महामंडळाचे कर्ज प्रकरणे बंद होते. ह्या सरकारने महामंडळासाठी निधी उपलब्ध करुन दिला असून कर्जासाठी अर्ज मागवण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात शेकडोने अर्ज आले. टार्गेट फक्त जिल्ह्यासाठी 65 प्रकरणाचे देण्यात आले. आता हे 65 प्रकरणे कसे काढण्यात येणार असा पेच महामंडळासमोर पडू शकतो. 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे.
अण्णा भाऊ साठे महामंडळाचे कर्ज प्रकरणे गेल्या अनेक वर्षापासून बंद होते. शासनाने त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिलेले नव्हता. सध्याच्या सरकारने निधी दिला असून पुन्हा आता कर्ज प्रकरणासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. प्रत्येक जिल्हा पातळीवर अर्ज दाखल झाले. एका एका जिल्ह्यात शेकडोंने अर्ज आलेले आहे. शेकडोंने अर्ज असले तरी यातून फक्त 65 प्रकरणे मंजुर करायचे आहे. हे प्रकरणं कशाप्रकारे मंजूर केली जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. एक लाखापर्यंत हे कर्ज प्रकरण आहे. राज्यासाठी 1200 कर्ज प्रकरणांचे टार्गेट देण्यात आले असून आतापर्यंत राज्यात 5 हजारापेक्षा जास्त संबधीत कार्यालयामध्ये आलेले आहे.