गेवराई (रिपोर्टर) भरदिवाळीच्या दिवशी आझाद मैदानावर उपोषण करत शिक्षक बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारला भाग पाडणारे शिक्षक नेते किरण पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून या मतदारसंघात विजयाची मोहर पसरल्याचा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी व्यक्त केला तर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी भाजपा ही व्यक्तीकेंद्रीत पार्टी नसून ही एक संस्था असल्याचे सांगत पाटील यांची उमेदवारी आपल्याला विश्वासात घेऊन देण्यात आल्याचे म्हटले. पाटील यांच्या विजयासाठी बीड जिल्ह्याची पुर्ण ताकद त्यांच्या पाठिशी उभा करू आणि त्यांचा विजय निश्चित असल्याचे पंकजा मुंडेंनी म्हटले.
त्या औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या भाजपा उमेदवार पाटील यांच्या प्रचार सभेत गेवराई येथे बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर खा. प्रितम मुंडे, आ. लक्ष्मण पवार, राजेंद्र मस्के, संजय केणेकर, उमेदवार किरण पाटील, अक्षय मुंदडा, प्रवीण घुगे यांच्यासह आदी उपस्थित होते. पुढे बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, भर दिवाळीच्या दिवशी आझाद मैदानावर उपोषण करत शिक्षक बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारला भाग पडणारे शिक्षक नेते किरण पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यापासून या मतदार संघात विजयाची मोहर पसरत असल्याचे दिसत आहेत.
शिक्षकांच्या हक्कासाठी रात्रंदिवस लढा देणारे लढाऊ नेते म्हणून त्यांना उमेदवारी निश्चित केलेली आसून त्याचा विजय कोणीही रोखू शकणार नाही असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाई, शिवसंग्राम, रयतक्रांती संघटना व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रा.किरण पाटील यांच्या प्रचार मेळाव्या दरम्यान प्रसंगी ते बोलत होते. पंकजा मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या, भारतीय जनता पार्टी की एक व्यक्ती केंद्रीत पार्टी नसून ती एक संस्था आहे. त्यामुळे प्रा.पाटील यांची उमेदवारी मला विश्वासात घेऊनच निश्चित झाली झाली. जेव्हा किरण पाटील पक्षाकडे उमेदवारी साठी गेले तेव्हा पक्षाचे प्रदेश अध्यक्ष यांनी किरण पाटील यांना माझी शिफारस घेऊन या असे सांगितले यानंतर ते माझ्या भेटीसाठी उज्जेनला आले आणि मला भेटले तेव्हा माझ्या परळीतील उमेदवार होत असेल तर मला आनंदच आहे असे सांगून मी त्यांना शुभेच्छा दिल्या. म्हणून आज भाजप आणि मी काही वेगळे नाहीत मी कायम पक्षाचे आदेश आणि प्रोटोकॉल पाळत आसल्याचे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले. म्हणून बीड जिल्ह्याची पूर्ण ताकद ही प्रा.किरण पाटील यांच्या पाठीशी उभी करून त्यांना मोठी ताकद देणार असून त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी खा.प्रीतमताई मुंडे, आ.लक्ष्मण पवार, राजेंद्र मस्के, संजय केनेकर यांनी मार्गदर्शन करत प्रा.किरण पाटील यांच्या पाठीशी बीड जिल्ह्याच्या वतीने मोठी ताकद उभा करू असा विश्वास दिला. यावेळी मोठ्या संख्येने संस्था चालक, शिक्षक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
गेवराई तालुका मोठ्या ताकदीने किरण पाटील यांच्या पाठीशी उभा राहील – आ. पवार
तालुक्यात काजी ठराविक संस्था सोडल्या तर बाकी सर्व संस्थाचालक व शिक्षक हे आपल्या पाठीशी उभे राहतील आणि काही नाराज शिक्षकांचे अदृश्य मत ही अपल्याच बाजूने असल्याने गेवराई तालुक्यातील सर्व शिक्षक मतदार बांधव हे प्रा.किरण पाटील यांच्या पाठीशी उभे करू असा विश्वास आ.लक्ष्मण पवार यांनी दिला.