बीड (रिपोर्टर)ः- तरुण हे देशाचे आणि समाजाची सपंत्ती असते. तरुणाचे आरोग्य चांगले असेल तरच तो प्रगती करू शकतो, मात्र आज अनेक तरुण वेगवेगळ्या नशेच्या आहारी जात असल्याने त्यांचे शरीर तर खराब होतच आहे त्याचबरोबर कौटुंबिक कलह वाढत आहेत. तरुणांनी नशेपासून दूर रहावे, असे मौलिक आवाहन मौलाना उमरेन रहेमानी यांनी आयोजीत कार्य क्रमात केले.
रात्री बीड शहरातील मिल्लिया महाविद्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला शेख अहेमदन साहिब काशिफी, मोहीयोद्दीन खान साहिब कास्मी, मुफ्ती मुहम्मद आरीफ साहब आरिफी, ह.मौ. अमीन साहब रशिदी, ह.मौ.अब्दुल बाकी साहब, ह.मौ.नसरुल्लाह खान रहेमानी, मुफ्ती अब्दुलाह कुरैशी साहब कास्मी, शेख जाहिरद साहब नदवी, ह.मौ.अब्दुल रहीम जाहिद साहब, मुफ्ती महोम्मद अन्वर नोमानी साहब सह अन्य उलेमा एकराम उपस्थित होते.
पुढे बोलताना मौलाना उमरेन म्हणाले की, चांगला समाज घडविण्यासाठी शिस्तीची गरज आहे त्याचबरोबर तरुणांना कसल्याही प्रकारचे व्यसन असता कामा नये. व्यसनाच्या आहारी गेलेली तरुणाई उद्ध्वस्त होत असते. त्यामुळे कौटुंबिक कलह वाढतात. तरुणांनी कसल्याच प्रकारचे व्यसन करू नये, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी या वेळी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.