बीड (रिपोर्टर) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होत आहे. काल माजलगावच्या डीवायएसपींनी दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून तब्बल 4 लाखांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी दिंद्रुड पोलिस ठाण्यात पंडित गंगाधर थावरे (रा. आनंदगाव, ता. माजलगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगावचे डीवायएसपी यांना माहिती मिळाल्यावरून त्यांनी आपल्या पथकासह दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोगरा शिवारात छापा टाकला. या वेळी पंडित गंगाधर थावरे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये तब्बल 3 लाख 91 हजार 117 रुपयांचा गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तो सर्व गुटखा पोलिसांनी जप्त करत दिंद्रुड पोलिसात पंडित थावरे याच्या विरोधात कलम 328, 272, 273, 188 नुसार आतिषकुमार शंकरराव देशमुख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.