पहिल्या सामन्याची संधी शहरातल्या
अंडर थर्टीन, फोर्टीन, सिक्सटीनच्या खेळाडूंना
बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडुंना प्रोत्साहीत करण्याहेतू सायं. दैनिक बीड रिपोर्टर व रिपोर्टर क्रिकेट अकॅडमीने आरपीएलचे आयोजन केले असून श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आज आ. संदीप क्षीरसागर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन झाले. उद्घाटनप्रसंगी अंडर थर्टीन, अंडर फोर्टीनसह अंडर सिक्सटीनचे दोन संघ मैदानात उतरवण्यात आले. महाराष्ट्रात प्रथमच राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत युवा खेळाडुंना प्राधान्य देत उद्घाटन करण्यात आले.
सायं. दैनिक बीड रिपोर्टर व रिपोर्टर क्रिकेट अकॅडमीच्या वतीने आयोजीत रिपोर्टर प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम यांच्या उपस्थितीमध्ये श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर मोठ्या थाटात संपन्न झाले. बीडसह परिसरामधून मोठ्या संख्येने प्रेक्षकवर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होता. बीड जिल्ह्यातील खेळाडुंना प्रोत्साहन मिळावं या हेतुने सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांनी प्रत्येक वर्षी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सुरू केले आहे.
या स्पर्धेला यापुर्वीच्या स्पर्धेत मोठा प्रतिसाद मिळाला. बीड शहरासह जिल्हाभरातील ग्रामीण भागात क्रिकेयसह अन्य खेळांमध्ये प्राविण्य असलेले अनेक खेळाडू आहेत. त्यांना व्यासपीठ मिळत नाही. क्रिकेट खेळणारे खेळाडू मोठ्या प्रमाणावर आहेत. अनेक अष्टपैलू तेज गोलंदाज, बॅटस्मन, नव्हे नव्हे तर चित्तथरारक सामना खेचून आणणारे अनेक तरुण जिल्ह्याच्या विविध ठिकाणी दिसून येतात. अशा स्थितीत या मुलांना व्यासपीठ मिळावं यासाठी आरपीएलचे प्रयोजन करण्यात आलेले आहे. उद्घाटन झाल्यानंतर पहिला सामना हा स्पर्धेत सहभागी झालेल्य संघांचा न ठेवता क्रिकेटचा सातत्याने सराव करणार्या बीड शहरातील अंडर 13, 14, आणि 16 मधील मुलांमध्ये खेळवण्याचे ठरविण्यात आले.
त्याठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक करून प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात झाली. हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.