Friday, October 22, 2021
No menu items!
Homeक्राईमदेवाणघेवाणीवरून पाटोद्यात वादावादी, गोळीबार जमावबंदीचे आदेश धुडकावले, आठ जण पोलीसांच्या ताब्यात

देवाणघेवाणीवरून पाटोद्यात वादावादी, गोळीबार जमावबंदीचे आदेश धुडकावले, आठ जण पोलीसांच्या ताब्यात


पाटोदा (रिपोर्टर):- आर्थिक देवाणघेवाणीवरून पाटोद्यामध्ये दोन गटात वाद उफळून आला. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत बाचाबाची केली. यातच एकाने रिव्हॉल्व्हरमधून हवेत दोन वेळा फायर केले. या घटनेने पाटोदा शहरात एकच खळबळ उडाली.


घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आठ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले. सध्या कोरोनाचा संसर्ग असल्याने जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. असे असतानाही या ठिकाणी २० ते २५ पेक्षा जास्त लोक एकत्रित आले होते. या लोकांनी जमावबंदीचे आदेश पायदळी तुडवले. या प्रकरणी आरोपीविरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पाटोदा येथील विश्‍वनाथ घुले यांच्या घरासमोर रात्री आर्थिक देवाणघेवाणीवरून वादावादी झाली. घुले यांच्या दारासमोर संतोष लक्ष्मण जाधव, शरद ज्ञानोबा बामदळे, सुधाकर नवनाथ गर्जे, गणेश खाडे, अमृत भोसले, मयुर जाधव, संदीप जाधव व सतर २० ते २५ जण जमले. त्यामध्ये दोन गटात चांगलीच बाचाबाची झाली. या बाचाबाचीतून विश्‍वनाथ घुले यांनी आपल्या पिस्टलमधून दोन राऊंड हवेद फायर केले. त्यामुळे पाटोदा शहरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पाटोदा पोलीसचे सहायक पोलीस निरीक्षक आंधळे, बळीराम केशव कातखडे, तांदळे, भोसले, सानप, हे कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. पोलीसांनी आठ जणांना ताब्यात घेतले. सध्या कोरोनाचा संसर्ग असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लावलेले आहेत. जमावबंदी आदेश असतानाही एकाच ठिकाणी २० ते २५ जण जमा झाले होते. नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी बळीराम कातखडे यांच्या फिर्यादीवरून २० ते २५ जणांविरोधात १४३, १४४, १४५, १४७, १४८, १४९, १८८, २६९, २७०, १६० भा.दं.वि.सह कलम ३/२५, ७/२७ सह कलम ५१ (ब) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम सह कलम ३ साथरोग अधिनियमसह कलम ११२/११७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!