बीड (रिपोर्टर) काही लोकांना एकत्र करत आरडाओरड करून तलवार दाखवत दहशत निर्माण केल्या प्रकरणी माऊली डांबे याच्यासह इतर तिघा जणांविरुद्ध वडवणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
कैलास दिलीप उजगरे यांनी वडवणी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. 25 जानेवारी 2023 रोजी कैलासचा भाऊ तुषार उजगरे, बाहेगव्हाण येथील परमेश्वर मस्के व इतरांबरोबर त्याचे भांडण झाले होते. त्यावरून तुषार उजगरे, समाधान उजगरे, कपील उजगरे, आकाश उजगरे, युवराज उजगरे यांच्याविरोधात परमेश्वर अच्युतराव मस्के यांनी दिलेल्या तक्रारीवरून कलम 307, 395, 143, 147, 148, 149, 504, 506 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. दि. 27 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कैलास दिलीप उजगरे सोबत अविनाश साळवे, शाम सुधाकर उजगरे, पवन उजगरे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून भीमनगरकडे जात असताना बाहेगव्हाण येथील माऊली डांबे हातामध्ये धारदार तलवार घेऊन आरडाओरड करत त्यांच्या जवळ आला व त्याच्यासोबत साहील भोरे, ओम देशमुख, विशाल भंडाणे हेही होते. त्यांनी तेथे गोंधळ घातला व त्या गोंधळाचा व्हिडिओ करून माऊली डांबे याने तो व्हिडिओ व्हॉटस्अॅप स्टेटसला ठेवत त्याच्यामध्ये माझ्या भावाला हात लावला तर तुमच्या चौकात राडा घालणार, आज वडवणी बंद केी, उद्या तुमचे घराबाहेर निघणे बंद करणार, असा मजकूर लिहिला होता. त्यावरून तो मला धमकी देत असल्याची तक्रार कैलास दिलीप उजगरे याने वडवणी पोलिसात दिली. त्यावरून माऊली डांबे, साहील भोरे, ओम देशमुख, विशाल भंडाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.