Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeक्राईमधक्कादायक! जिल्हाधिकार्‍यांना पाठवलेले वाळू उपश्याचे व्हिडिओ वाळू तस्करांकडे

धक्कादायक! जिल्हाधिकार्‍यांना पाठवलेले वाळू उपश्याचे व्हिडिओ वाळू तस्करांकडे


वाळू उपसा करणार्‍या मजुरांमुळे गेवराई तालुक्यात कोरोना वाढतोय
बीड/गेवराई (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग सर्वत्र झपाट्याने वाढत असताना जिल्ह्यातील वाळू ठेक्यांसह नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळुचा उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनासह जिल्हा प्रशासन कमालीचे दुर्लक्ष करत असून गेवराई तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव येथील गोदा पात्रातून होणारा उपसा आणि वाळु उपश्यासाठी उपस्थित असलेला विना मास्क मजूर याबाबतची इत्यंभूत माहिती जिल्हाधिका-र्‍यांपर्यंत गेल्यानंतरही याकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड होत असून ज्या लोकांनी जिल्हाधिकार्‍यांना याबाबतचे व्हिडिओ आणि फोटो टाकले ते व्हिडिओ-फोटो जिल्हाधिकार्‍यांनी गेवराई येथील आजी-माजी आमदारांसह वाळु माफियांना टाकल्याचा गंभीर आरोप होत आहे.
गेवराई तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव भागातून जाणार्‍या गोदावरी पात्रातून रात्रंदिवस अवैधरित्या वाळु उपसा होत आहे. हा वाळु उपसा करण्यासाठी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मजूर या भागात दिसून येतो. नदीपात्रामध्ये कुठलेही सोशल डिस्टन्स पाळता, मास्क न लावता शेकड्यांवर असलेले मजूर बिनधास्तपणे वाळु उपसा करून गावामध्ये सामान आणण्यासाठी ये-जा करतात. त्यामुळे गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत, अशा प्रकारची तक्रार आणि अवैध वाळु उपश्याचे फोटो आणि व्हिडिओ जिल्हाधिकार्‍यांना राजेंद्र डाके नामक व्यक्तीने व्हॉटसॅऍपवर टाकून कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली, परंतु वाळु उपश्याविरोधात कारवाई करण्यापेक्षा जिल्हधिकार्‍यांनी हे फोटो आणि व्हिडिओ गेवराई तालुक्यातील आजी-माजी आमदरांना पाठवले तसेच वाळु तस्करांनाही याची माहिती दिल्याचा आरोप डाके यांनी केला. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोरोना काळातही तेव्हा अवैध वाळु उपश्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई करत वाळु साठे जप्त केले होते परंतु विद्यमान जिल्हाधिकारी व तहसीलदार सचिन खाडे जाणीवपुर्वक या वाळु तस्करीकडे दुर्लक्ष करतात. कोरोनाच्या नावाखाली सर्रासपणे अवैध वाळु उपसा करण्यास वाव देतात. असा गंभीर आरोप करण्यात आला असून आता तरी जिल्हाधिकार्‍यांनी अवैध वाळु उपश्याविरोधात थेट कारवाईचा बडगा उगारावा आणि गेवराई तालुक्यातला कोरोना आटोक्यात आणावा.

Most Popular

error: Content is protected !!