बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांचा टोला
बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना ही क्षीरसागरांच्या क्रुपेने निजाम सेना झाली आहे. ठाकरे शिवसेनेत मोठी इनकमिंग होत असल्याचे दाखवल जातय परंतु एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षासह इतरांचे पक्षप्रवेश हे क्षीरसागर कुटुंबीयांच्या इच्छेनुसारच झालेले आहेत, असा टोला बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी प्रसिद्धीपत्रकातून लगावला आहे.
पुढे म्हटले आहे की. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षासह इतरांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षात प्रवेश दिला आहे. दर नगरपालिका निवडणुकी आधी क्षिरसागर घराण आपली राजकीय खेळी करत असत त्या डावपेचा प्रमाणे ते नगरपालिका निवडणुकी आधी शहरातील संख्येने मोठ्या असणार्या प्रत्येक समाजाचे उमेदवार निवडून येऊ नये म्हणून त्या समाजाच्या मताचे विभाजन करण्यासाठी विविध पक्षात त्या त्या समाजाचे लोक उमेदवार म्हणून पाठवुन त्या समाजाचे जास्तीत जास्त उमेदवार उभे करुन मताचे विभाजन करायच.
अगदी याच ठरलेल्या डावपेचांचा भाग म्हणून क्षिरसांगरांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात काही लोकांचा प्रवेश करुन घेतला . साडेचार वर्ष क्षिरसागरांना विरोध दाखवायचा. आनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर हीच लोक क्षीरसागरांचे प्यादे म्हणून राजकीय भुमिका बजावतात. अगदी अशा मंडळींमुळे क्षीरसागर कुटुंबियांना आजतागायत राजकीय लाभ होत आला आहे. नगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागरांनी केलेल्या खेळीचा भाग बनत राजकीय प्याद्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश घेतले आहेत. कट्टर हिंदु विरोधी एम.आय. एम. चे नेते उद्या स्वताला हिंदुत्व वादी म्हणणार्या ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून पुढे आले तर आश्चर्य वाटण्या कारन नाही . ही लोक क्षीरसागरांच्या इच्छेनुसारच ठाकरे गटात आली आहेत हे बीड ची जनता न समजल्या ऐवजी खुळी नाही. संबंधितांमुळे बीडच्या राजकारणावर कसलाही परिणाम होणार नाही, मात्र उद्धव ठाकरे यांच्या गटाला आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये तोंडघशी पडण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, असाही टोला बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी लगावला आहे.